शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन, नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 17:50 IST

कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे.

ठळक मुद्देकामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहेजॉर्ज साहेबांना जेव्हा-जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्यात एक साधुत्वाची, फकीराची वृत्ती दिसली जॉर्ज साहेबांसारख्या लढवय्या कार्यकर्त्याचे, लोककल्याणकारी नेत्याचे निघून जाणे समाजाचे फार मोठे नुकसान करणारे आहे

नवी दिल्ली - कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. ते माझे आयकॉन आहेत, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली. 

कामगार नेते ते देशाचे संरक्षणमंत्री असा प्रवास करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना नितीन गडकरी म्हणाले, ''कामगार-कष्टकऱ्यांसाठी लढतांना स्वतःच्या जीवाची, सुख-दुःखाची तमा न बाळगणारा लढवय्या नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांच्याबद्दल माझ्या मनात कमालीची श्रद्धा आहे. जॉर्ज साहेबांना जेव्हा-जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्यात एक साधुत्वाची, फकीराची वृत्ती दिसली. आपल्या मुल्यांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याचा राजकारणातील सुरुवातीचा काळ संघर्षाचा असतो मात्र एकदा सत्ता, पद-प्रतिष्ठा मिळाली की, तो तडजोडीचे, हितसंबंध जपण्याचे राजकारण करतो. सामान्य माणसाचे प्रश्न त्याला नंतर फार महत्वाचे वाटत नाहीत. जॉर्ज साहेब मात्र आयुष्यभर फक्त लढतच राहिले. ते कधी प्रस्थापित झाले नाहीत. आपल्यातील कार्यकर्तेपण त्यांनी नष्ट होऊ दिले नाही. म्हणून मी त्यांना माझा ‘आयकॉन‘ मानत होतो. आपल्या राजकारणातून सामान्य माणसासाठीचा संघर्ष, कळकळ हळूहळू कमी होत असतानाच्या काळात जॉर्ज साहेबांसारख्या लढवय्या कार्यकर्त्याचे, लोककल्याणकारी नेत्याचे निघून जाणे समाजाचे फार मोठे नुकसान करणारे आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.''  

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसNitin Gadkariनितीन गडकरीIndiaभारत