मनोरमा बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:49+5:302015-08-08T00:23:49+5:30

सोलापूर : मनोरमा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वतावरणात पार पडली. यावेळी मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्यासह चेअरमन रंजना सुरवसे आणि संचालक उपस्थित होते.

General meeting of Manorama Bank | मनोरमा बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

मनोरमा बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

लापूर : मनोरमा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वतावरणात पार पडली. यावेळी मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्यासह चेअरमन रंजना सुरवसे आणि संचालक उपस्थित होते.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या सभेची सुरुवात मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. यावेळी बँकेचे सभासद गोविंदलाल दरक, निवृत्ती केत, गणपत कदम, किरण काडगावकर उपस्थित होते. प्रारंभी प्रकाश भोसले यांनी प्रास्ताविक केले.
सन २०१४ - १५ या आर्थिक वर्षामध्ये बँकेस एकूण १.३२ कोटी ४९ हजार ९६ रूपये इतका निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळाने सभासदांना बारा टक्के लाभांशाची शिफारस केलेली होती. मोरे यांनी लाभांश वाढविण्यापेक्षा कल्याण निधीमध्ये वाढ करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देऊन १० टक्के लाभांश मंजूर करण्यात आला. चंद्रकांत माने, केत, कदम यांनी बँकेच्या थकबाकीसंदर्भात प्रश्न विचारले. नेट एनपीए कमी असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी नवीन सहा शखा विस्ताराबाबतही सभासदांनी समाधान व्यक्त केले.
फोटो ओळी - मनोरमा बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या दीपप्रज्ज्वलनाप्रसंगी बँकेचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे, चेअरमन रंजना सुरवसे, अस्मिता गायकवाड निवृत्ती केत, शोभा मोरे, संतोष सुरवसे आदी.

Web Title: General meeting of Manorama Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.