दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक गिलानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2016 17:03 IST2016-02-18T16:56:22+5:302016-02-18T17:03:39+5:30
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानीला पतियाळा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका पत्रकार परिषदेत देशाविरोधात

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक गिलानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानीला पतियाळा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका पत्रकार परिषदेत देशाविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी एसएआर गिलानीला अटक करण्यात आली होती.
दोनदिवसांपूर्वी पतियाळा न्यायालयाने एसएआर गिलानींला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला आज न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एसएआर गिलानीने एका पत्रकार परिषदेत देशाविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी देशद्रोह आणि अन्य आरोपांखाली अटक त्याला केली. तसेच, त्याच्यावर कलम १२४ अ देशद्रोह, १२० ब गुन्हेगारी कट रचण आणि कलम १४९ या कलमांखाली पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.