जेजुरी कैलास स्मशानभूमीस गेट

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30

जेजुरी : येथील कै. दिनकररव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने जेजुरीतील कैलास स्मशानभूमीला सरस्वती सावंत यांच्या स्मरणार्थ लोखंडी गेट बसविण्यात आले आहे.

Gaze to Jezuri Kailas Cemetery | जेजुरी कैलास स्मशानभूमीस गेट

जेजुरी कैलास स्मशानभूमीस गेट

जुरी : येथील कै. दिनकररव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने जेजुरीतील कैलास स्मशानभूमीला सरस्वती सावंत यांच्या स्मरणार्थ लोखंडी गेट बसविण्यात आले आहे.
तीर्थक्षेत्र जेजुरीत कैलास स्मशानभूमीत नंदनवन साकारण्याचे ध्येय येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण बारभाई यांनी हाती घेतलेले आहे. शेकडो वृक्षांची लागवड करून ही स्मशानभूमी फुलली आहे. मोकाट जनावरापासून येथील झाडांचे संरक्षण व्हावे म्हणून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या कै. दिनकररव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला लोखंडी गेट बसवून देण्यात आले आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण बारभाई, गणेश डोंबे, महेश बारभाई, प्राचार्य नंदकुमार सागर, प्रतिष्ठानचे सचिव संजय सावंत आदी उपस्थित होते.
फोटो :
जेजुरीतील कैलास स्मशानभूमीला गेट बसवून देताना उपस्थित मान्यवर.
०००

Web Title: Gaze to Jezuri Kailas Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.