गस्तीच्या २३ बोटी दुरुस्तीअभावी किनार्यावर पडून !
By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:41+5:302015-08-02T23:31:41+5:30
जमीर काझी

गस्तीच्या २३ बोटी दुरुस्तीअभावी किनार्यावर पडून !
ज ीर काझीमुंबई : राज्यातील सागरीसुरक्षेमध्ये महत्त्वाच्या असलेल्या गस्ती बोटींबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. गस्तीसाठीच्या तब्बल २३ बोटी नादुरुस्त असून त्यामध्ये केंद्राच्या सहा बोटींचा समावेश आहे. या बंद बोटींमुळे उर्वरित बोटींच्या फेर्या वाढल्या असून अतिवापरामुळे त्यातही बिघाड होण्याची शक्यता आहे.सध्या एकूण ३३ सागरी पोलीस ठाणी असून याठिकाणी ९१ तपासणी नाके (चेकपोस्ट) कार्यरत आहेत. गस्तीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्व सुविधायुक्त ६९ अद्यावत बोटी स्वतंत्रपणे पुरविण्यात आल्या आहेत. मात्र पूर्ण राज्याच्या सागरी किनार्यावर रोज गस्तीसाठी केवळ ३०-३५ बोटींचा वापर केला जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आली. गृहविभागातील एका वरिष्ठ अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार १२ व ५ टन वजनाच्या एकूण २८ बोटी केंद्राच्या आहेत. त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केंद्राने गोव्याच्या शिपयार्ड कंपनीकडे सोपविली आहे. तर राज्य सरकारच्या १२ मीटर लांबीच्या ७ तर ९.५ मीटर लांबीच्या २२ बोटी असून त्यांचीही देखभाल शिपयार्ड कंपनीकडून होते. याशिवाय जुन्या १२ बोटी असून त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी मोटार परिवहन विभागाकडून (एमटी) केली जाते.