शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:20 IST

Gautam Tetwal : मध्य प्रदेश सरकारमधील एका भाजपच्या मंत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या देशातील राजकीय वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक हैं तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बंटेंगे तो कटेंगे’ घोषणांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मध्य प्रदेश सरकारमधील एका भाजपच्या मंत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अजान ऐकून भाषण थांबवणारे मंत्री हे मंचावरूनच ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ म्हणताना दिसत आहेत. यावरून पुन्हा राजकीय चर्चांना वेग आला आहे.

मध्य प्रदेशमधील डॉ. मोहन यादव सरकारमधील गौतम टेटवाल हे मंत्री आहेत. राजगढ जिल्ह्यातील मऊ गावात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गौतम टेटवाल आले होते. गौतम टेटवाल हे भाषण करत असताना अजान सुरू झाली. अजान सुरू झाल्याचे ऐकताच गौतम टेटवाल यांनी भाषण थांबवले. ज्या वेळी हा कार्यक्रम होत होता, त्यावेळेस सव्वा सात वाजले होते आणि ईशाची नमाज होत होती. अजान संपल्यानंतर मंत्री गौतम टेटवाल यांनी संस्कृतमधील एक श्लोक म्हटला.  ते म्हणाले, “वह कहता है कि उससे डरो, नेक काम करो। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।”. यानंतर त्यांनी मंचावरूनच ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह…’, असेही पठण केले. गौतम टेटवाल यांचा यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल सध्या होत आहे. यावरून काहींनी त्यांच्यावर निशाणा साधला असून हिंदू समाजाची माफी मागावी, असे म्हटले आहे.

हिंदू समाजाची माफी मागावी - तिवारीमंचावरून भाजपच्याच मंत्र्याने कलमा पठण केल्यामुळे संस्कृती बचाव मंचाने विरोध केला आहे. संस्कृती बचाव मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, मंत्री सर्व धर्माचा आदर करतात यात दुमत नाही. मात्र, आम्ही हिंदुत्ववादी लोक त्यांच्यासाठी लढाई लढतोय. मंदिरात आरती सुरू असल्यावर कोणताच मंत्री आपले भाषण थांबवत नाही किंवा त्यात सहभागी होत नाही. पण अजान सुरू झाली की भाषण थांबवतात आणि आता तर स्वत: कलमा पठण करत आहेत. उद्या नमाजही पढतील, असा संताप चंद्रशेखर तिवारी यांनी व्यक्त केला. गौतम टेटवाल हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी आणि आपण भर मंचावर जे केले ते योग्य आहे का याचा विचार करावा. आपण योग्य केले असे त्यांना वाटत असेल तर हिंदू समाजही त्यांच्याबाबत वेगळा विचार करायला मोकळा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाSocial Viralसोशल व्हायरलMadhya Pradeshमध्य प्रदेश