गौतम खेतान यांना न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: October 6, 2014 23:54 IST2014-10-06T23:54:05+5:302014-10-06T23:54:05+5:30
३६०० कोटींच्या अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात लाच घेतल्याचा आरोप असलेले उद्योगपती गौतम खेतान यांना दिल्लीच्या न्यायालयाने मंगळवारपर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड दिला आहे

गौतम खेतान यांना न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली : ३६०० कोटींच्या अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात लाच घेतल्याचा आरोप असलेले उद्योगपती गौतम खेतान यांना दिल्लीच्या न्यायालयाने मंगळवारपर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खेतान यांना अटक केली होती.
खेतान यांना आणखी चौकशीसाठी आपल्या कस्टडीत ठेवण्याची गरज नाही, असे ईडीतर्फे सांगण्यात आल्यानंतर महानगर दंडाधिकारी स्रिग्धा सर्वारिया यांनी रविवारी त्यांची दोन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याआधी खेतान यांना पाच दिवसांसाठी ईडीच्या कस्टडीत पाठविण्यात आले होते. ही कस्टडी मुदत संपल्यामुळे रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)