शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गौतम गंभीर करणार भाजपासाठी 'बॅटिंग', दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 13:50 IST

पुढच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तगडा फलंदाज भेटण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली -  पुढच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तगडा फलंदाज भेटण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 आणि  एकदिवसीय विश्वचषक विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलणारा गौतम गंभीर लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच भाजपाकडून तो दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

डावखुरा फलंदाज गौतम गंभीर याने 2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दमदार फलंदाजी करून भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. तसेच गंभीरने 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 9 शतके आणि चार हजार धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 शतके आणि पाच हजार धावा त्याच्या नावावर आहेत.दीर्घकाळापासून भारतीय संघाबाहेर असलेला गौतम गंभीर गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र सध्या तो ट्विटरवरून विविध मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो. तसेच त्याने मोदी सरकारच्या अनेक निर्णयांना ट्विटरवरून जाहीर पाठिंबाही दिला होता. दरम्यान, आम आदमी पक्षाशी दोन हात करण्यासाठी दिल्लीमधील आपली स्थिती भक्कम करण्यावर भाजपाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी  भाजपा लोकप्रिय आणि विश्वसनीय चेहऱ्याच्या शोधात आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपाकडून गंभीरला पक्षप्रवेशासाठी पायघड्या घातल्या जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरCricketक्रिकेटPoliticsराजकारणNew Delhiनवी दिल्ली