शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:35 IST

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. 

नवी दिल्ली -  भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत शाहिदनं सहानुभूती व्यक्त केल्याबाबत गंभीरनं त्याची चांगलीच अक्कल काढली आहे. 

'काश्मीरची परिस्थिती ही अस्वस्थ, चिंता करणारी आहे',असे ट्विट आफ्रिदीनं केले होते.  यावर गौतम गंभीर म्हणाला की, शाहिद आफ्रिदीच्या ट्विटसंदर्भात मीडियानं माझी प्रतिक्रिया मागितली. यावर काय बोलणार. शाहिद आफ्रिदीने 'यूएन'वर नजरा लावल्या आहेत. मात्र त्याच्या डिक्शनरीत 'यूएन'चा अर्थ अंडर 19 असा आहे आणि हे त्याचे वयही आहे. मीडियाने त्याच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. नो बॉलवर विकेट घेण्याचा आनंद घेण्याची पाकिस्तानी खेळाडूंची सवयच आहे.''

 

 

शाहिद आफ्रिदीनं नेमके काय केले ट्विट?जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने कंठस्नान घातलेल्या अतिरेक्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला. लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात त्याने गरळ ओकली. शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करत काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनेच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत.    'भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्वत:च्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दडपशाहीने दाबला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत?'' असे शाहिदीनं ट्विटमध्ये म्हटले. शाहिद आफ्रिदीने हा पहिल्यांदाच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला नाही. याआधी म्हणजेच गेल्यावर्षी त्याने याबाबतीत ट्विट केले होते. त्यावेळी त्याने म्हटले होते, काश्मीरमध्ये गेल्या काही दशकांपासून क्रूरतेचे शिकार होत आहेत. आता वेळ आली आहे की या समस्येचे निराकरण केले पाहिजे, ज्यामुळे अनेक लोक मारले गेले. तसचे, दुस-या ट्विटमध्ये काश्मीर धरतीवरील स्वर्ग आहे आणि आम्ही निरपराधांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

13 दहशतवाद्यांचा खात्मादरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी दहशतवाद्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.

टॅग्स :Shahid Afridiशाहिद अफ्रिदीGautam Gambhirगौतम गंभीरJammu Kashmirजम्मू-काश्मीर