शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये चीन सीमेवर उंटांवरून गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:11 IST

नवी दिल्ली : लडाखला लागून असलेल्या चीनसोबतच्या प्रत्यक्ष सीमारेषेवर गस्त घालण्यासाठी आणि त्या दुर्गम व खडतर भागात रसद पुरवठा करण्यासाठी खेचरांसोबत उंटांचाही वापर करण्याची लष्कराची योजना आहे.

नवी दिल्ली : लडाखला लागून असलेल्या चीनसोबतच्या प्रत्यक्ष सीमारेषेवर गस्त घालण्यासाठी आणि त्या दुर्गम व खडतर भागात रसद पुरवठा करण्यासाठी खेचरांसोबत उंटांचाही वापर करण्याची लष्कराची योजना आहे. सध्या या कामासाठी लडाखमध्ये खेचर आणि तट्टू (लहान घोडे) वापरले जातात.सध्या यासाठी एक पथदर्शक योजना हाती घेण्यात आली असून काही निवडक उंटांना या कामासाठी प्रशिक्षित केले जात आहे. त्यात यश आले तर समुद्रसपाटीपासून १२ हजार ते १५,५०० फूट उंचीपर्यंतच्या लडाखच्या भागात गस्त व रसद वाहतूक यासाठी उंटांचा नियमित वापर केला जाऊ शकेल.संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) लेह येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ हाय अ‍ॅल्टिट्यूड रीसर्च लॅबॉरेटरी’ने (दिहार) उंट किती वजन, किती उंचीपर्यंत व किती अंतर वाहून नेऊ शकतात यादृष्टीने संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी उंटांना प्रशिक्षणही दिले जात आहे. सध्या देशाच्या पश्चिम सरहद्दीवर थारचे वाळवंट आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर गस्त घालण्यासाठी प्रामुख्याने सीमा सुरक्षा दलाकडून उंटांचा वापर केला जातो.>हवामानाचा सरावलष्कराने बिकानेर येथील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रातून एका वशिंडाचे चार उंट लडाखमध्ये आणले आहेत. त्यांना तेथील हवामानाचा सराव करणे व प्रशिक्षण देण्याचा काम सुरू आहे. दुसरीकडे ‘दिहार’ संस्थेने यंदाच्या फेब्रुवारीत दोन वशिंडांचे स्थानिक उंट आणून त्यांच्यावर काम सुरू केले आहे.>उंट अधिक उपयुक्तखेचर व तट्टू साधारणपणे ४० किलो ओझे वाहू शकतात. तट्टूंच्या तुलनेत दोन वशिंडांची चाल जलद असते व समाट रस्ता असेल तर ते दोन तासांत १० ते १५ किमीचे अंतर कापू शकतात. 2 वशिंडांच्या उंटांची ओझे वाहण्याची क्षमता १८० ते २२० किलोपर्यंत असते.>दोन वशिंडे असलेल्या उंटांचा वापर होणारयासाठी दोन वशिंडे असलेल्या (डबल हम्प्ड) व एका वशिंडाच्या उंटांचा वापर केला जाणार आहे. भारतात दोन वशिंडांचे उंट फक्त लडाखच्या न्युब्रा खोºयात आढळतात. सध्या तेथे असे सुमारे २०० उंट आहेत.नेहमी आढळणारे एका वशिंडांचेउंट देशात राजस्थानसह अन्यत्र अहेत. दोन वशिंडांच्या उंटांना ‘बॅक्टिरियन’ तर एका वशिंडाच्या उंटाला ‘ड्रॉमेडरी’ म्हटले जाते.