शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश, दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेंच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर; मात्र मारेकरी वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 07:34 IST

कर्नाटक एसआयटीच्या तपासातून महत्त्वपूर्ण माहिती समोर

बंगळुरु: गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुलं वापरण्यात आली. मात्र त्यांच्या हत्या करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या होत्या, अशी माहिती कर्नाटक पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल कलबुर्गी आणि पानसरे यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं. मात्र हे हल्ले करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या होत्या, अशी माहिती एसआयटीला मिळाली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी 11 जूनला परशुराम वाघमारेला अटक केली. परशुरामला उत्तर कर्नाटकमधील विजयपुरा येथील सिंधगीतून अटक करण्यात आली. गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चारजणांनी दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. हे चारजण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. चौकशीदरम्यान परशुराम वाघमारेनं लंकेश यांच्या हत्येची कबुली दिली. लंकेश यांची हत्या करण्यासाठी काहीजणांनी आपल्याला पिस्तुल वापरण्याचं प्रशिक्षण दिल्याचं वाघमारेनं पोलिसांना सांगितलं. ज्या ठिकाणी त्याला पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं, ते ठिकाणही त्यानं गुरुवारी पोलिसांना दाखवलं. हिंदू जनजागृती समितीचा माजी संयोजक अमोल काळेनं पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याची माहितीदेखील त्यानं पोलिसांना दिली.  गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी दोन 7.65 मीमीची दोन पिस्तुलं वापरण्यात आल्याचं एसआयटीच्या तपासातून समोर आलं आहे. मात्र या हत्या वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्या आहेत. या हत्यांमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. 'चार हत्यांसाठी वापरण्यात आलेली पिस्तुलं सारखी आहेत. मात्र या हत्या वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्या आहेत. या हत्यांचा कट रचण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दोन किंवा तीन व्यक्तींवर होती,' अशी माहिती कर्नाटक पोलीस दलातील सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशGovind Pansareगोविंद पानसरेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर