गौहरने पैसे देऊन श्रीमुखात मारुन घेतली ?
By Admin | Updated: January 4, 2015 16:18 IST2015-01-04T16:10:51+5:302015-01-04T16:18:36+5:30
गौहर खानने ज्यूनिअर कलाकाराला पैसे देऊन भर कार्यक्रमात स्वतःला मारहाण करायला लावली होती असा दावा गौहरला मारहाण करणा-या अकील मलिकने केला आहे.

गौहरने पैसे देऊन श्रीमुखात मारुन घेतली ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खानला श्रीमुखात लगावण्याच्या प्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. गौहर खानने पैसे देऊन भर कार्यक्रमात स्वतःला मारहाण करायला लावली होती असा दावा गौहरला मारहाण करणा-या अकील मलिकने केला आहे.
गेल्या महिन्यात एका रिएलिटी शोच्या शुटिंग दरम्यान शोची सूत्रधार गौहर खानला अकिल मलिकने श्रीमुखात लगावली होती. गौहर मुसलमान असूनही छोटे कपडे घालते असे मलिकने मारहाणीनंतर म्हटले होते. याप्रकरणी गौहरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मलिकला अटकही केली होती. मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.मारहाणीसाठी गौहरनेच पैसे दिले होते असा दावा मलिकने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. २८ नोव्हेंबरपूर्वी मला गौहर खान कोण आहे हेदेखील माहित नव्हते. २८ नोव्हेंबर रोजी शूटींग संपल्यावर गौहरला भेटायला गेलो व मला काही मिळवून देण्याची विनंती केली. यानंतर गौहरने मला दुस-यादिवळी सकाळी येऊन भेटायला सांगितले. दुस-या दिवशी सकाळी गौहरने दबंग ३ मध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले व त्या मोबदल्यात रिएलिटी शोच्या शुटिंगमध्ये मला मारहाण कर असे सांगितले होते असा आरोपही मलिकने केला. मारहाणीनंतर मी तुझ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करीन पण पोलिसांनी तुझ्यावर कठोर कारवाई करु नये अशी विनंतीही पोलिसांना करीन असे गौहरने म्हटल्याचे मलिकने सांगितले. हे सर्व संभाषण तोंडी झाले होते असे मलिकने नमुद केले.