शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 03:33 IST

सौराष्ट्र, कच्छ भागात पुन्हा अलर्ट जारी

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने वारंवार आपला मार्ग बदलल्याने हवामान विभागासह प्रशासनाला बुचकळ्यात टाकले असून शनिवारी त्याने आपला मार्ग पुन्हा बदलून कच्छ दिशेने सरकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सौराष्ट्र, कच्छ भागात पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.कर्नाटकाच्या दक्षिण भागात आगमन झालेल्या मान्सूनची शनिवारी प्रगती झाली नाही़ येत्या दोन दिवसात कर्नाटक, तमिळनाडूचा उर्वरित भाग तसेच ईशान्यकडील बंगालचा उपसागर, सिक्कीममध्ये आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार असे जाहीर करण्यात आले होते़ त्यादृष्टीने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुजरात राज्य सरकारने खबरदारीच्या उपाय योजना केल्या होत्या़ त्यानंतर गुरुवारी ‘वायू’ने आपला मार्ग बदलून तो पुन्हा समुद्राच्या दिशेने वळला होता़ त्यामुळे ‘वायू’ आता समुद्रातच शमणार, ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले़ त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा एकदा त्याने आपला मार्ग बदलून ते आता कच्छ दिशेने पुढे सरकू लागले आहे़ शनिवारी दुपारी ते पोरबंदरपासून ३२५ किमी, वेरावळपासून ३८० किमी आणि दीवपासून ४३५ किमी अंतरावर होते.येत्या २४ तासात या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून तीव्र चक्रीवादळाचे चक्रीवादळात रुपांतर होईल़ १७ जूनला त्याची तीव्रता आणखी कमी होऊन सायंकाळी ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ सौराष्ट्र, कच्छ भागात पुढील तीन दिवस तर उत्तर गुजरात, दक्षिण राजस्थानमध्ये १८ जूनला मुसळधार पावसाची शक्यता आहे़मुंबईत मान्सूनची प्रतीक्षाचमुंबई : अरबी समुद्रात पश्चिम दिशेला सरकलेल्या वायू चक्रीवादळाची दिशा बदल्यामुळे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचलेल्या पावसाला कोकणात येण्यास आणखी विलंब होणार आहे. परिणामी, शहरात गेले दोन दिवस अधूनमधून हलक्या सरी सुरू असल्या, तरी मुंबईला आणखी काही दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.या वर्षी मान्सून विलंबानेच केरळमध्ये पोहोचला आहे. त्यातच अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ धडकले. त्यामुळे गेले काही दिवस मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. या वादळाचा प्रभाव पुढील दोन दिवसही राज्यातील किनारपट्टींवर कायम असणार आहे. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण व हलक्या सरी सुरू राहतील. मात्र, मान्सूनचे मुंबईतील आगमन पुढच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडले आहे.