शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'चौकीसमोर गांजा मिळतो', विद्यार्थ्याने सर्वांसमोर पोलिसांनाच दाखवला आरसा, Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 21:28 IST

अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्याने सर्वांसमोर पोलिसांची पोलखोल केली.

Sonipat News: पोलीस अनेकदा अमली पदार्थांविरोधात कारवाई केल्याचा दावा करतात, पण काहीवेळा त्यांचे दावे फोल ठरतात. अशीच एक घटना हरियणाच्या सोनीपतमधून समोर आली आहे. येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमादरम्यान विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने सर्वांसमोर पोलिसांची पोलखोल केली. विद्यार्थ्याने थेट डीसीपींना आरसा दाखवला. 

चार विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले गुरुवारी पोलिसांनी सोनीपतच्या राय एज्युकेशन सिटीमध्ये असलेल्या अशोका युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जागरुक करण्यासाठी एका सेमिनारचे आयोजन केले होते. यामध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी, अशोका युनिव्हर्सिटी, एसआरएम युनिव्हर्सिटी आणि ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, या चार प्रसिद्ध विद्यापीठांमधून विद्यार्थी आले होते. या सेमिनारला डीसीपी सतीश कुमार आणि इतर पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देऊन त्याचे सेवन न करण्याचे आवाहन केले. यावेळी एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने थेट पोलिसांना गोत्यात आणले.

काय म्हणाला तो विद्यार्थी?पोलिसांसमोर विद्यार्थ्याने सांगितले की, 'इथे अनेक मुले ड्रग्ज विक्री करणाऱ्याला शोधतात आणि त्यांच्याकडून ड्रग्स घेतात. मुलांना ड्रग्सवाले सापडतात, मग पोलिसांना हे सर्व का दिसत नाही? आमच्या विद्यापीठासमोर पोलिस चौकी असून खुलेआम गांजाची विक्री केली जाते. गांजा किंवा इतर मादक पदार्थ मिळवणे चॉकलेट मिळवण्यासारखे सोपे आहे. हे पोलिसांचे अपयश आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?' विद्यार्थ्याचे बोलणे ऐकून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्याला समर्तन दर्शवले. पोलिसांची पोलखोल करणाऱ्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसDrugsअमली पदार्थStudentविद्यार्थीSocial Viralसोशल व्हायरल