गांगुलीला धमकी देणारा पोलीसांच्या ताब्यात
By Admin | Updated: January 14, 2017 00:10 IST2017-01-14T00:10:03+5:302017-01-14T00:10:03+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 39 वर्षीय व्यक्तीला आज अटक करण्यात आले आहे

गांगुलीला धमकी देणारा पोलीसांच्या ताब्यात
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 13 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 39 वर्षीय व्यक्तीला आज अटक करण्यात आले आहे. शुक्रवारी गांगुलीने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते.
पश्चिम मेदिनीपुर येथून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे निर्मलया सामंत असे आहे. 19 जानेवारीला पश्चिम मेदिनीपुरच्या विद्यासागर युनिव्हर्सिटीमध्ये होणा-या कार्यक्रमात सहभागी झाला, तर यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे प्रकरचे पत्र लिहून त्याने 5 जानेवारीला गांगुलीच्या घराबाहेर टाकले होते.
सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. कॉलेजमधील होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी त्याला मुख्य पाहुणा म्हणुन आमंत्रीत करण्यात आले होते.