सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर सचिन बिश्नोईला घेतले ताब्यात; अझरबैजानमधून भारतात आणले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:13 PM2023-08-01T16:13:20+5:302023-08-01T16:13:45+5:30
पंजाबमधील फाजिल्का येथील रहिवासी असलेल्या बिश्नोईला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.
गेल्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. या हत्येप्रकरणी कथितरित्या सहभागी असलेला गँगस्टर सचिन बिश्नोई याला अझरबैजानमधून भारतात आणण्यात आले आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या प्रकरणातील कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे अधिकारी अझरबैजानची राजधानी बाकू येथे गेले होते.
मातेनेच नाळेने आवळला नवजात शिशुचा गळा; आशा वर्कर्सची तपासात बहुमोल मदत
मिळालेली माहिती अशी, बिश्नोई उर्फ सचिन थापनचे बाकू येथून यशस्वीपणे प्रत्यार्पण करण्यात आले. पंजाबमधील फाजिल्का येथील रहिवासी असलेल्या बिश्नोईला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.
सचिनने भारतात राहून मुसेवाला हत्याकांडाची नियोजन केले. सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या काही दिवस आधी बिश्नोई बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून गेला होता. काही दिवसापूर्वी एनआयएने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी विक्रमजीत सिंग उर्फ विक्रम ब्रार याला अटक केली. विक्रम ब्रारला प्रत्यार्पणाअंतर्गत यूएईमधून भारतात आणण्यात आले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. एनआयएने सांगितले की, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्यासह इतर आणि व्यावसायिकांच्या हत्येमध्ये ब्रारचा हात होता.
याशिवाय, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला गुजरातच्या तुरुंगातून दिल्लीत आणून राष्ट्रीय राजधानीतील मंडोली तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याने मुसेवाला याच्या हत्येतील आपला सहभाग नाकारला आहे.
मुसेवाला याची मे २०२२ मध्ये हत्या झाली होती. सिद्धू मुसेवाला म्हणून ओळखले जाणारे शुभदीप सिंग सिद्धू यांची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गायकाला पॉईंट ब्लँक रेंजवर गोळी मारण्यात आली आणि मानसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. हल्लेखोरांनी मूसवाला यांच्यावर ३० हून अधिक राऊंड गोळीबार केला.