गँगस्टर रवी पुजारीच्या नावे वाडियांना धमक्या?

By Admin | Updated: June 19, 2014 02:50 IST2014-06-19T02:50:34+5:302014-06-19T02:50:34+5:30

प्रीती झिंटा - नेस वाडिया प्रकरणाने आज नवे वळण घेतले. प्रीतीचा छळ केल्यास उद्ध्वस्त करू

Gangster Ravi Pujari threatens Wadia threat? | गँगस्टर रवी पुजारीच्या नावे वाडियांना धमक्या?

गँगस्टर रवी पुजारीच्या नावे वाडियांना धमक्या?

मुंबई : प्रीती झिंटा - नेस वाडिया प्रकरणाने आज नवे वळण घेतले. प्रीतीचा छळ केल्यास उद्ध्वस्त करू, अशी धमकी देणारे फोन, एसएमएस गँगस्टर रवी पुजारीच्या नावे आल्याची तक्रार वाडिया कुटुंबीयांनी आज ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या फोनचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
१६ जूनला उद्योगपती नस्ली वाडिया यांचे निवासस्थान, कार्यालय येथे हे फोन आले. वाडिया यांच्या दोन पीएंच्या (सचिव) मोबाइलवर मी रवी पुजारी, अशी ओळख सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तीने धमक्या दिल्या. तसेच धमकीचा एक एसएमएसही वाडिया कुटुंबीयांना आला आला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gangster Ravi Pujari threatens Wadia threat?