शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर रवी पुजारीला सेनेगलमधून अटक; प्रत्यार्पणासाठी चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 00:26 IST

बंगळुरू पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर अटकेची कारवाई

मुंबई: गँगस्टर रवी पुजारीला पूर्व आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय तपास यंत्रणा रवी पुजारीवर नजर ठेवून होत्या. काही दिवसांपूर्वी तो बुर्किनो फासोमध्ये होता, अशी माहिती यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर बंगळुरु पोलिसांनी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर लगेचच सेनेग पोलिसांनी रवी पुजारीला अटक केली. यानंतर आता भारत सरकार सेनेगलसोबत प्रत्यार्पणाबद्दल चर्चा करत आहे. रवी पुजारीविरोधात भारतात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी रवी पुजारी विरोधात तक्रार दाखल केली होती. पुजारीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. फोन कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मेवाणी यांना धमकावणाऱ्या व्यक्तीनं स्वत:चं नाव रवी पुजारी असल्याचं म्हटलं होतं. याआधी रवी पुजारीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये बहुतांश कलाकार पुजारीला घाबरतात, असं म्हटलं जातं. रवी पुजारीच्या इशाऱ्यांवरुन त्याचे गुंड कलाकारांना धमकावतात. रवी पुजारीच्या गुंडांनी दिग्दर्शक महेश भट्ट यांनादेखील मारण्याचा प्रयत्न केला होता. याआधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमनं रवी पुजारीचा सर्वात मोठा खबरी असलेल्या आकाश शेट्टीला कर्नाटकमधून अटक केली. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत, सचिन कदम यांच्या दोन टीम मंगळुरुत होत्या. 25 जानेवारीला एका लग्नासाठी शेट्टीला तिथे आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. त्याआधी 15 जानेवारीला विल्यिम रॉड्रिग्सला अटक झाली. त्याच्या चौकशीतून शेट्टीचं नाव पुढे आलं होतं. 

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीunderworldगुन्हेगारी जगत