चोरट्यांची टोळी गजाआड

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:04+5:302015-02-13T23:11:04+5:30

चोरीचे साहित्य जप्त : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

Gangs of thieves | चोरट्यांची टोळी गजाआड

चोरट्यांची टोळी गजाआड

रीचे साहित्य जप्त : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
नागपूर : चौकीदाराला मारहाण करून कंपनीतील साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचे साहित्यही जप्त केले.
८ फेब्रुवारीच्या रात्री ११.१५ वाजता चार आरोपी एकता कास्टिंग कंपनीच्या आवारात शिरले. तेथील चौकीदार महेंद्र जयदेव झा (वय ६०, रा. दत्तवाडी) यांना मारहाण करून आरोपींनी तेथून १६ हजारांचे साहित्य चोरून नेले.
या घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे पीएसआय रवींद्र बारड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यांना रवी विलास दांडे (वय २२, शिवाजीनगर वाडी), विजय आनंदराव चौधरी (वय ४०), दीपक प्रताप बिस्ट (वय २३), आशिष विनायक चव्हाण (वय २०) आणि राहुल निधानराव तायडे (वय २८, सर्व रा. वाडी) हे संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी एकता कंपनीतील चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले साहित्य तसेच प्लेझर दुचाकी जप्त केली. पीएसआय बारड, हवालदार दिनेश सिंग, नायक विनोद कांबळे, विजय मानापुरे, रमेश कनेरे, सुनीत गुजर, सचिन पाटील यांनी ही कामगिरी बजावली.
----

Web Title: Gangs of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.