गांजा तस्कर नाना ऊर्फ शरिफला अटक
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:37+5:302015-01-23T01:05:37+5:30
आठ वर्षे गुंगारा : विशाखापणमला पकडले

गांजा तस्कर नाना ऊर्फ शरिफला अटक
आ वर्षे गुंगारा : विशाखापट्टणमला पकडलेनागपूर : आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्कर मोहम्मद शरिफ ऊर्फ नाना इसाक याला अटक करण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले. गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ३ जानेवारीला २० किलो गांजासह चौघांना पकडले होते. त्यांच्या चौकशीतून गांजा तस्कर नाना याची माहिती पोलिसांना कळली. त्यावरून अमलीपदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, पीएसआय मुस्ताक शेख, हवालदार दत्ता बागुल यांच्या पथकाने विशाखापट्टणम गाठून नानाला पकडले. त्याला नागपुरात आणून त्याची चौकशी करण्यात आली. नानाची टोळी असून, गांजा विकण्याच्या आरोपाखाली कोर्टाने त्याला २००३ मध्ये १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा भोगत असताना प्रकृती बिघडल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. तेथून २९ डिसेंबर २००६ ला आरोपी नाना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्याचा पोलीस ठिकठिकाणी शोध घेत होते. तब्बल ८ वर्षांनतर तो पोलिसांच्या हाती लागला.-----