गंगापूररोडला गावठी क˜्यासह एकाला अटक

By Admin | Updated: August 2, 2016 23:36 IST2016-08-02T23:19:04+5:302016-08-02T23:36:29+5:30

नाशिक : गंगापूररोड येथील चोपडा लॉन्सजवळून जाणार्‍या एका संशयास्पद मोटारीला पोलिसांनी थांबविले असता चालकाकडून एक गावठी क˜ा व वाहनामधून शस्त्रे जप्त केली आहेत. सरकारवाडा पोलिसांनी मनोज ऊर्फ मन्या वझरे यास अटक केली आहे.

Gangapur rode arrested with the villager | गंगापूररोडला गावठी क˜्यासह एकाला अटक

गंगापूररोडला गावठी क˜्यासह एकाला अटक

नाशिक : गंगापूररोड येथील चोपडा लॉन्सजवळून जाणार्‍या एका संशयास्पद मोटारीला पोलिसांनी थांबविले असता चालकाकडून एक गावठी क˜ा व वाहनामधून शस्त्रे जप्त केली आहेत. सरकारवाडा पोलिसांनी मनोज ऊर्फ मन्या वझरे यास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूररोडमार्गे हनुमानवाडी-मखमलाबाद लिंकरोडवरून दिंडोरीकडे एक संशयास्पद व्यक्ती पांढर्‍या रंगाच्या मोटारीने गावठी क˜ा व शस्त्रे घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी परिसरात सापळा रचला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पांढर्‍या रंगाची लोगान कार (एमएच १५, ई ७३४८) पोलिसांनी पुलाच्या अलीकडे थांबविली. दरम्यान, वाहनचालक संशयित वझरे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी क˜ा आढळून आला. तसेच मोटारीमधून काही शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. वझरे याने चौकशीदरम्यान, यापूर्वी गावठी क˜्याची विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वझरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून शहरात कोणाला गावठी क˜े विक ले, याची माहिती पोलीस तपासात पुढे येणार आहे. पोलिसांनी मोटारीसह तीन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर करीत आहेत.

Web Title: Gangapur rode arrested with the villager