बेंगळुरुत सुरक्षा रक्षकांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: November 12, 2015 15:51 IST2015-11-12T15:51:39+5:302015-11-12T15:51:39+5:30

सेंट्रल बेंगळुरुतील टेनिस अॅकेडमीत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या ३० वर्षीय महिलेवर दोघा सुरक्षा रक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली.

Gang raped by security guards in Bangalore | बेंगळुरुत सुरक्षा रक्षकांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

बेंगळुरुत सुरक्षा रक्षकांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि. १२ -  कर्नाटकमधील बेंगळुरु पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. सेंट्रल बेंगळुरुतील टेनिस अॅकेडमीत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या ३० वर्षीय महिलेवर दोघा सुरक्षा रक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली.  

टुमकूर जिल्ह्यात राहणारी ३० वर्षीय महिला बुधवारी कर्नाटक स्टेट लॉन टेनिस असोसिएशनच्या क्लब नाव नोंदवण्यासाठी बेंगळुरुत आली होती.पण रात्री येईपर्यंत उशीर झाल्याने क्लब बंद झाले होते. यानंतर कबन पार्क येथील सुरक्षारक्षकांनी तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. या दोघांनी तिला मदत करण्याचे आश्वासन देत तिला निर्जनस्थळी नेले. यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला रस्त्यावरच सोडून दिले. गस्तीवरील पोलिसांना पिडीत महिला जखमी अवस्थेत आढळली व ही घटना उघड झाली.   गेल्या दोन महिन्यात बेंगळुरुत सामूहिक बलात्काराची ही तिसरी घटना आहे.  

 

Web Title: Gang raped by security guards in Bangalore