तरुणीवरील सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:13+5:302015-08-27T23:45:13+5:30

नोएडा: महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हॉटस् ॲपवर व्हायरल करण्यात आल्याची घटना येथे घडली.

The gang rape video viral on the girl | तरुणीवरील सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल

तरुणीवरील सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल

एडा: महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हॉटस् ॲपवर व्हायरल करण्यात आल्याची घटना येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लखनावली गावातील ही तरुणी घरी परतत असताना तीन जणांची तिचे अपहरण केले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधमांपैकीच एकाने या अमानवीय प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरणही केले. त्यानंतर या पीडित मुलीला अवैध शस्त्रास्त्रे ठराविक ठिकाणी पोहोचविण्यास सांगण्यात आले. परंतु तिने नकार दिल्यानंतर हा व्हिडिओ व्हॉटस् ॲपवर अपलोड करण्यात आला. याप्रकरणी तरुणीने पोलिसात तक्रार नोंदविली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The gang rape video viral on the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.