बंगळुरूत चाकूचा धाक दाखवून तरूणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: October 6, 2015 10:52 IST2015-10-06T10:52:09+5:302015-10-06T10:52:34+5:30

कॉल सेंटरमध्ये काम करणा-या २३ वर्षीय तरूणीला चाकूचा धाक दाखवून मिनी बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत घडली.

Gang rape in Bangalore, gang rape | बंगळुरूत चाकूचा धाक दाखवून तरूणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार

बंगळुरूत चाकूचा धाक दाखवून तरूणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ६ - संपूर्ण देशाला हादरवणा-या दिल्लीतील 'निर्भया' बलात्कार प्रकरणाची बंगळुरूत पुनरावृत्ती झाली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणा-या एका २३ वर्षीय तरूणीला चाकूचा धाक दाखवून मिनी बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बंगळुरूत शनिवारी रात्री घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरची रहिवासी असून ती बंगळूरूच्या कॉलेजमध्ये शिकतानाच कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती. शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ती घरी जात असताना मिनी बसमध्ये आलेल्या तीन नराधमांनी माडीवाल बस स्टॉपजवळून तिचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी ती बस बंगळुरूजवळील कोरमंगला परिसरात नेऊन चाकूचा धाक दाखवत तरूणीवर सामूहिक बलात्कार केला.  या परिसरात एरवी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असतो, मात्र दुर्दैवाने त्या दिवशी तेथे कोणीच गस्तीवर नव्हते. या घटनेनंतर त्या नराधमांनी तिला रस्त्यावर फेकून दिला, गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणीने कसेबसे रुग्णालय गाठले. याप्रकरणी बंगळुरू पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. 

Web Title: Gang rape in Bangalore, gang rape