देवदर्शनावरून परतताना महिलेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: June 18, 2017 00:19 IST2017-06-18T00:19:58+5:302017-06-18T00:19:58+5:30
देवदर्शनावरून परतत असताना एका महिलेवर फॉर्च्युनर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उरुळी कांचन-जेजुरी

देवदर्शनावरून परतताना महिलेवर सामूहिक बलात्कार
- लोकमत न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन (पुणे) : देवदर्शनावरून परतत असताना एका महिलेवर फॉर्च्युनर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये शुक्रवारी रात्री १०.३०च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला केडगाव (ता. दौंड) परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. रात्री उशीर झाल्याने ती वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथे उभी होती. या वेळी त्या ठिकाणी फोर्च्युनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी तिला गाडीत बसविले. पुढे शिंदवणे घाटात नेऊन बलात्कार केला आणि नंतर तिला घाटातच सोडून दिले. या दोघांनी परत माघारी येऊन जीवे मारण्याची धमकीही दिली.