नाशकातही टोळीयुद्ध

By Admin | Updated: May 11, 2014 00:35 IST2014-05-11T00:35:31+5:302014-05-11T00:35:31+5:30

नाशिक : डी गँग, गवळी गँग, छोटा राजन गँग, नाईक गँग, पुजारी गँग अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या आपसातील गँगवारच्या बातम्या कानावर येत असत़ मुंबईतील या टोळीयुद्धाची जागा आता नाशिक शहराने घेतली की काय, अशी शंका आता नागरिकांच्या मनात उत्पन्न झाली आहे़ गेल्या वर्षभरात घडलेल्या आणि या वर्षातील गुन्हेगारी टोळक्यांच्या घडामोडींचा आढावा घेतल्यास यावर शिक्कामोर्बत होते़ शुक्रवारी घडलेल्या भीम पगारे हत्त्येमुळे तर नाशिकमधील टोळीयुद्ध चांगलेच चर्चेत आले आहे़

Gang battle in Nashik | नाशकातही टोळीयुद्ध

नाशकातही टोळीयुद्ध

शिक : डी गँग, गवळी गँग, छोटा राजन गँग, नाईक गँग, पुजारी गँग अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या आपसातील गँगवारच्या बातम्या कानावर येत असत़ मुंबईतील या टोळीयुद्धाची जागा आता नाशिक शहराने घेतली की काय, अशी शंका आता नागरिकांच्या मनात उत्पन्न झाली आहे़ गेल्या वर्षभरात घडलेल्या आणि या वर्षातील गुन्हेगारी टोळक्यांच्या घडामोडींचा आढावा घेतल्यास यावर शिक्कामोर्बत होते़ शुक्रवारी घडलेल्या भीम पगारे हत्त्येमुळे तर नाशिकमधील टोळीयुद्ध चांगलेच चर्चेत आले आहे़
७ मे २०१३ रोजी सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे या दोघांची हत्त्या झाली अन् नाशिकच्या टोळीयुद्धाला सुरुवात झाली, अशी चर्चा खुद्द पोलीस वर्तुळातून ऐकावयास मिळते़ पोलिसांची वक्रदृष्टी असेपर्यंत ही गुन्हेगार मंडळी सुप्तावस्थेत असतात, मात्र थोड्याच दिवसात दुर्लक्ष झाले की पुन्हा डोके वर काढतात़
गेल्या वर्षभरातील नाशिक शहरातील टोळीयुद्धाचा विचार करावयाचा झाल्यास सिडकोतील टिप्पर गँग, चांगले गँग, मल्हारखाणीतील पगारे गँग या प्रामुख्याने चर्चेत आल्या़याबरोबरच चौकाचौकांतील भाईिगरीनेही डोके वर काढले़ या भाईिगरीला अंकुश बसावा यासाठी स्थानबद्धता, तडीपारीची कारवाईदेखील पुरेशी ठरत नसल्याचे दिसून येते़ मुळात हे गुन्हेगार शहर सोडून जातच नसल्याचे पोलिसांनी पकडलेल्या तडीपारांच्या आकडेवारीवरून दिसून येते़
शहरात केवळ तडीपारच गुन्हेगारी कृत्य करतात असे नव्हे तर नाशिकरोडच्या मध्यवर्ती तुरुंगातून पॅरोलवर सुटून आलेल्यांकडून शहरात खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ खुनाच्या गुन्‘ात जामीन मिळालेल्या पंचवटीतील चौघा अ˜ल गुन्हेगारांनी सुनील कोल्हे यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते़ या गुन्हेगारांवर अंकुश लावण्यास पोलीस कमी पडत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे़
नाशिकच्या या टोळ्यांमधील सराईत गुन्हेगार इतके निर्ढावले आहेत की, पोलीस अधिकार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे़ १५ मार्च २०१३ रोजी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम़ एम़ गावित यांना टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाण याने मारहाण केली़ या घटनेची पुनरावृत्ती ७ मे रोजी पुन्हा झाली़ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना मारहाण झाली़ यापूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये उपचारासाठी आलेला चांगले खून प्रकरणातील संशयित गिरीश शे˜ी याच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या चौघांनी तेथे ड्यूटीवर असलेल्या दोन पोलिसांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़
नाशिक शहरातील या सर्व घटनांकडे पाहता गेल्या वर्षभरातील सुप्तावस्थेत असलेल्या टोळीयुद्धाचा मध्येमध्ये भडका उडत असल्याचेच दिसून येते़ याकरिता पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमने कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी हे पुन्हा सुरू करावे मात्र याचा त्रास जनसामान्यांना होणार नाही याबाबत पोलिसांनी दक्ष रहावे.(प्रतिनिधी)

--इन्फ ो--
२०१३ मध्ये गुन्हेगार व टोळक्यांकडून १४ खून
२०१३ या वर्षात घडलेल्या ३४ खुनांच्या घटनांपैकी सराईत गुन्हेगार व टोळक्यांच्या हाणामारीत एकूण १४ खून झाले आहेत़ त्यातील सर्वाधिक खून हे मे व ऑक्टोबर महिन्यात झाले़ शहरात खर्‍या अर्थाने टोळीयुद्धाला सुरुवात झाली ती सराईत गुन्हेगार मोहन चांगले, दीपक सोनवणे यांच्या खुनापासूऩ यानंतर श्रीपाद सूर्यवंशी, अशोक साळवे, विशाल चौधरी(मध्यवर्ती कारागृह), विक्रम परदेशी, संतोष धनगर, दत्ता ऊर्फ विकी प्रकाश वाघ, विपीन बाफ णा, गणेश धोत्रे, जुनेद शहा, सुनील इंगळे, सुनील कोल्हे, अब्दुल खान, ॲड़ मेधा जगताप यांचा समावेश आहे़


--इन्फ ो--
2014 मध्ये अबतक 10
विजय

Web Title: Gang battle in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.