बार्शीच्या नगराध्यक्षपदासाठी दोघांचे तीन अर्ज दाखल गणेश जाधव यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित : औपचारिकता बाकी

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:31+5:302015-08-31T21:30:31+5:30

बार्शी : बार्शी नगरपरिषदेचे अध्यक्ष रमेश पाटील व उपाध्यक्षा अरुण परांजपे या दोघांनी राजीनामे दिल्याने नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून, आज(सोमवारी) नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश जाधव व सुनील वायचळ या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत़ यापैकी गणेश जाधव यांच्या नावावर राष्ट्रवादीने शिक्कामोर्तब केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े

Ganesh Jadhav's nomination for President's post for Barshi's post | बार्शीच्या नगराध्यक्षपदासाठी दोघांचे तीन अर्ज दाखल गणेश जाधव यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित : औपचारिकता बाकी

बार्शीच्या नगराध्यक्षपदासाठी दोघांचे तीन अर्ज दाखल गणेश जाधव यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित : औपचारिकता बाकी

र्शी : बार्शी नगरपरिषदेचे अध्यक्ष रमेश पाटील व उपाध्यक्षा अरुण परांजपे या दोघांनी राजीनामे दिल्याने नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून, आज(सोमवारी) नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश जाधव व सुनील वायचळ या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत़ यापैकी गणेश जाधव यांच्या नावावर राष्ट्रवादीने शिक्कामोर्तब केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े
याबाबत अधिक माहिती अशी, विद्यमान नगराध्यक्ष रमेश पाटील व उपनगराध्यक्षा अरुणा परांजपे या दोघांनीही आपल्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे स्वखुशीने आपले राजीनामे दिले आहेत़ त्यानंतर त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविला आह़े त्यानंतर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून, आज(सोमवारी) अर्ज दाखल करण्याचा एकमेव दिवस होता़ त्यामध्ये अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश जाधव यांचे दोन तर राष्ट्रवादीचेच सुनील वायचळ यांचा एक असे तीन अर्ज मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे दाखल झाले आहेत़ यामध्ये गणेश जाधव यांच्या अर्जावर अनुक्रमे राहुल कोंढारे, रमेश पाटील ,शमशोद्दीन बागवान व अरुणा परांजपे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत तर सुनील वायचळ यांच्या अर्जावर संदीप बारंगुळे व ज्योतिर्लिंग कसबे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत़ आज(सोमवारी) झालेल्या छाननीमध्ये दोन्ही उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले असल्याचे प्रसाद काटकर यांनी सांगितल़े
गणेश जाधव यांच्यासोबत अर्ज दाखल करताना योगेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विलास रेणके, नगरसेवक राहुल कोंढारे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील ,मनीष चौहान, नगरसेवक नागेश अक्कलकोटे, भगवान पवार,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बंडू माने, ज्येष्ठ नेते तानाजी मांगडे, अमोल गुडे, शि़मं़ सदस्य सचिन गावसाने , दिनेश जाधव आदी उपस्थित होत़े
चौकट
दि़ 1 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून, या प्रकरणी जर कोणी अपील केले तर दि़ 2 रोजी त्याचा निर्णय झाल्यानंतर दि़ 4 सप्टेंबर रोजी विशेष निवडणूक सभा घेऊन नवीन नगराध्यक्ष जाहीर केला जाणार आह़े नगराध्यक्ष निवडीनंतर त्याच दिवशी दुपारी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेतली जाणार आह़े नगराध्यक्षाची संधी जाधव यांना दिल्यानंतर आता उपाध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे मात्र अद्याप निश्चित नाही़
महत्वाची चौकट
राष्ट्रवादीने दोन अर्ज दाखल केले असले तरी आ़ दिलीप सोपल यांचे खंदे सर्मथक गणेश जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आह़े आ़ दिलीप सोपल यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मते जाणून घेतली होती व त्यानुसारच आज अर्ज दाखल केले आहेत़ गणेश जाधव हे पहिल्यांदाच नगरसेवक झालेले असून, ते प्रभाग 3 मधून विजयी झालेले आहेत़ त्यांनी योगेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केले असून यापूर्वी त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून देखील काम पाहिलेले आह़े एक जनमानसातील हाडाचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या गणेश जाधव यांच्या रुपाने बार्शीकरांना एक धडाडीचा नगराध्यक्ष मिळणार आहे ़

Web Title: Ganesh Jadhav's nomination for President's post for Barshi's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.