गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त!

By Admin | Updated: December 12, 2014 02:34 IST2014-12-12T02:34:25+5:302014-12-12T02:34:25+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे वक्तव्य करून भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी नवा वाद ओढवून घेतला आह़े

Gandhiji's killer Nathuram Godse patriot! | गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त!

गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त!

भाजपा खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य : महाराष्ट्रात साजरा झाला गोडसे शौर्यदिन
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे वक्तव्य करून भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी नवा वाद ओढवून घेतला आह़े राज्यसभेत त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटल्यानंतर मात्र त्यांनी यावरून घूमजाव केल़े याच संदर्भाने महाराष्ट्रात गत 15 नोव्हेंबरला नथुराम गोडसे शौर्यदिवस साजरा झाल्याचा मुद्दा काँग्रेसचे हुसैन दलवाई यांनी उपस्थित केला़ या मुद्यावरील गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आल़े
दरम्यान संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकारची बाजू मांडत, अशाप्रकारच्या कुठल्याही व्यक्तीचे मोठेपण मिरविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितल़े    सोबतच या प्रकरणात कुठल्याही विशिष्ट संघटनेला बदनाम करण्याचे प्रयत्न स्वीकारार्ह नसल्याचेही स्पष्ट केल़े
उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी गोडसे हा देशभक्त होता, असे वक्तव्य करून या वादाला तोंड फोडल़े गोडसेने चुकीने काही गोष्टी केल्या़ पण तो देशद्रोही नव्हता़ तो देशभक्त होता, असे साक्षी महाराज म्हणाल़े यावरून गोंधळ झाल्यावर मात्र आपण असे बोललोच नसल्याचे सांगत त्यांनी घूमजाव केल़े मी गोडसेला राष्ट्रभक्त मानत नाही़ मी चुकीने काही म्हटले असेल तर मी माङो वक्तव्य मागे घेतो, असे ते म्हणाल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
राज्यसभेत पडसाद, कामकाज दोनदा तहकूब
4गोडसे हा देशभक्त आहे, हे भाजपा खासदार साक्षी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि महाराष्ट्रात साजरा झालेला गोडसे शौर्यदिन या मुद्यावर काँग्रेस सदस्यांनी गुरुवारी राज्यसभेत जोरदार गदारोळ घातला़ 
 
4गुरुवारी राज्यसभेत शून्य तासादरम्यान हुसैन दलवाई यांनी हा मुद्दा उपस्थित केला़ संपूर्ण जगाला अहिंसेचे तत्त्वज्ञान देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केली़ राष्ट्रपित्याची हत्या करणा:या याच गोडसेला ‘मोठे’ करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहेत़
 
4महाराष्ट्रात गत 15 नोव्हेंबरला नथुराम गोडसे शौर्यदिवस साजरा झाला़ हे सर्वस्वी चुकीचे आह़े सरकारने यामागे असणा:या लोकांना अटक करावी़ सरकार या मुद्यावर शांत का? असा सवाल दलवाई यांनी यावेळी केला़
 
4यावरून काँग्रेस सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली़ तसेच याबाबतचे पोस्टर्स सभागृहात झळकवल़े शून्य तासात अशाप्रकारे पोस्टर्स झळकवणो शिस्तभंग असल्याचे सभापती पी़जे. कुरियन यांनी म्हटल़े दोष वा अन्य गोष्टी सिद्ध करण्यासाठी न्यायालये आहेत़ तुम्ही वा मी हे करू शकत नाही, असे सांगून त्यांनी काँग्रेस सदस्यांना शांत करण्याचे प्रयत्न केल़े मात्र काँग्रेस सदस्यांनी त्याला दाद न देता, गोंधळ सुरूच ठेवला़ सभागृहाने या प्रकाराची एकासूरात निंदा करायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केली़ 
4या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज एकदा 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आल़े दुस:यांदा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली़ अशा कुठल्याही व्यक्तीचे महाम्यपठण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ हा मुद्दा इथेच सोडला जाऊ शकत नाही़ मात्र यात कुठल्याही संघटनेला बदनाम करणो स्वीकार्य नाही, असे ते म्हणाल़े यानंतर गोंधळ निवळला व सभागृहात कामकाज सुरळीत झाल़े़

 

Web Title: Gandhiji's killer Nathuram Godse patriot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.