शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

'गांधी कुटुंब, डॉ. सिंग यांना संरक्षण पुन्हा बहाल करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:32 IST

राज्यसभेत आनंद शर्मा यांची मागणी

नवी दिल्ली : गांधी कुटुंब आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना राजकीय हेतूंच्या पलीकडे जाऊन स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) संरक्षण पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी राज्यसभेत बुधवारी केली.या मागणीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एसपीजीचे संरक्षण काढून घेण्याचा निर्णय हा धोका किती प्रमाणात आहे याच्या आधारावर घेतल्याचे सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचा मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियांका गांधी यांना असलेले एसपीजीचे संरक्षण आणि डॉ. मनमोहनसिंग यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असलेले झेड प्लस संरक्षण केंद्र सरकारने या महिन्याच्या प्रारंभी काढून घेतले आहे.शून्य कालावधीत आनंद शर्मा हा मुद्दा उपस्थित करून म्हणाले की, वरील चार नेत्यांचे संरक्षण त्यांना पुन्हा दिले जावे. नेत्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे सांगून शर्मा यांनी हे लक्षात आणून दिले की, केंद्रात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह माजी नेत्यांचे संरक्षण कायम ठेवले गेले होते. वाजपेयी व इतरांचे संरक्षण संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत ना कमी केले, ना ते काढून घेतले, असे शर्मा म्हणाले. गांधी कुटुंब आणि डॉ. सिंग यांचे एसपीजी संरक्षण काढून घेतल्यावर त्यांच्या जीविताबद्दलची काळजी साधार असल्याचे आढळले आहे, असेही त्यांनी म्हटले. शर्मा म्हणाले की, आमच्या नेत्यांचे जीवित, त्यांचे संरक्षण व सुरक्षा हे विषय राजकीय विचारांच्या पलीकडील असावेत, असे आमचे सरकारला आवाहन आहे.निर्णय गृहमंत्रालयाचाभाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी संरक्षण काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हणाले की, तो निर्णय गृहमंत्रालयाने घेतला असून, गांधी कुटुंबाला असलेला धोका हा श्रीलंकेत एलटीटीई संपल्यामुळे आता नाहीसा झाला आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंगPriyanka Gandhiप्रियंका गांधी