शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:22 IST

पीएम मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले.

BJP Congress LokSabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मध्य प्रदेशातील सभेतून विरोधकांच्या इंडिया आघाडीला (India Alliance) 'घमंडिया' आघाडी म्हटले. पीएम मोदींच्या या टीकेला काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी गुरुवारी(दि.14) प्रत्युत्तर दिले. जयराम रमेश यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंध जोडून NDA युतीवर निशाणा साधला. रमेश यांनी NDA आघाडीला (GA-NDA) 'गंदा' म्हटले.

मध्य प्रदेशातील सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी इंडिया आघाडीवर निशाणा साधत, 'घमंडीया' आघाडी म्हटले. 'सनातन धर्म पाळणाऱ्या प्रत्येकाने सतर्क राहावे. सनातन धर्माला नष्ट करुन हजारो वर्षे मागे गुलामगीरीत ढकलण्याचा इंडिया आघाडीचा हेतू आहे', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, 'पंतप्रधानांनी पुन्हा तेच केले, ज्यात ते माहिर आहेत, अपमान करणे. त्यांनी इंडिया आघाडीला पुन्हा खमंडीया आघाडी म्हटले. कोण बोलतंय पाहा, सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधकांचा अपमान करणारी व्यक्ती. त्याच्या पातळीवर जाऊन आम्ही म्हणू शकतो की, ते गौतम अदानी (GA-NDA) युतीचे प्रमुख आहे,' अशी टीका रमेश यांनी केली.

स्टॅलिन यांच्या विधानाने वादद्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'सनातन धर्मा'वरील वादग्रस्त विधानावरुन वाद सुरू झाला. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू,  मलेरिया आणि कोरोनाशी केली. यानंतर भाजप नेते सातत्याने इंडिया आघाडीवर टीका रत आहेत. भाजप नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाच मुद्दा पकडून भाजप नेते विरोधकांना धारेवर धरत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण