गजेंद्र सिंहच्या पोस्टमॉर्टेममध्ये ‘केजरी’ सरकारमुळे चालढकल
By Admin | Updated: April 30, 2015 02:10 IST2015-04-30T02:10:42+5:302015-04-30T02:10:42+5:30
गजेंद्र सिंह या शेतकऱ्याचे शवविच्छेदन तातडीने होऊ नये, यासाठी केजरीवाल सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.

गजेंद्र सिंहच्या पोस्टमॉर्टेममध्ये ‘केजरी’ सरकारमुळे चालढकल
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या रॅलीस्थळी कथितरीत्या आत्महत्या करणाऱ्या गजेंद्र सिंह या शेतकऱ्याचे शवविच्छेदन तातडीने होऊ नये, यासाठी केजरीवाल सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. आप कार्यकर्त्यांनी गजेंद्रला आत्महत्या करण्यासाठी चिथावल्याचेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. पण गृह मंत्रालयाला दिलेला हा अहवाल प्राथमिक होता, असे दिल्लीच्या पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)