गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त विविध कार्यक्रम
By Admin | Updated: February 29, 2016 23:02 IST2016-02-29T22:03:06+5:302016-02-29T23:02:24+5:30
नाशिक : श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त चरण पादुका पालखी सोहळा, प्रवचन आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जुन्या नाशकातील शिवाजी चौकात आयोजन करण्यात आले आहेत. मंगळवार दि. १ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. सकाळी ९ वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. जुन्या नाशकातून निघालेली ही मिरवणूक रामकुंडावर जाऊन संत गाडगे महाराज मठावरून पुन्हा शिवाजी चौकात येणार आहे. या ठिकाणी सकाळी ११ वाजता श्री श्री भाऊनाथ महाराज यांच्याहस्ते चरण व पादुका पूजन होणार आहे. दुपारी १२ वाजता हभप महंत रामानंद महाराज गिराजी महाराज(श्री क्षेत्र पुणतांबा) यांचे किर्तन होणार आहे. दुपारी १ते ३ वाजेदरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवनाथ फुलसंुदर तसेच बीराम वस्ताद तालिम संघ, शिवाजी तरूण मित्र म्

गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त विविध कार्यक्रम
नाशिक : श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त चरण पादुका पालखी सोहळा, प्रवचन आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जुन्या नाशकातील शिवाजी चौकात आयोजन करण्यात आले आहेत. मंगळवार दि. १ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. सकाळी ९ वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. जुन्या नाशकातून निघालेली ही मिरवणूक रामकुंडावर जाऊन संत गाडगे महाराज मठावरून पुन्हा शिवाजी चौकात येणार आहे. या ठिकाणी सकाळी ११ वाजता श्री श्री भाऊनाथ महाराज यांच्याहस्ते चरण व पादुका पूजन होणार आहे. दुपारी १२ वाजता हभप महंत रामानंद महाराज गिराजी महाराज(श्री क्षेत्र पुणतांबा) यांचे किर्तन होणार आहे. दुपारी १ते ३ वाजेदरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवनाथ फुलसंुदर तसेच बीराम वस्ताद तालिम संघ, शिवाजी तरूण मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ,भोइराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी).