शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

गगनयान, चांद्रयान-4, स्पेस स्टेशन अन् थेट चंद्रावर पाऊल; ISRO ची 2040 पर्यंतची तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 21:14 IST

National Space Day 2024 : आज राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त इस्रोने पुढील 20 वर्षांच्या योजनांची माहिती दिली.

National Space Day 2024 : आज राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे. गेल्या वर्षी, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर सरकारने हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले होते. यानिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने आपल्या आगामी मोहिमांची माहिती दिली आहे. इस्रोने सांगितल्यानुसार, 2035 पर्यंत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करेल. तसेच, पुढील वर्षी प्रक्षेपित होणाऱ्या गगनयान मोहिमेची पूर्ण तयारी झाली आहे. याशिवाय, चांद्रयान-4 मोहिमेच्या दिशेने वेगाने काम सुरू आहे. या मोहिमेद्वारे भारतीय यान चंद्राच्या मातीसह पृथ्वीवर परत येईल. 

गेल्या वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. आज पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, चंद्राशी संबंधित भारताच्या मोहिमांचा अनुभव अतिशय उत्कृष्ट आहे. चांद्रयान-4 मोहिमेत आम्ही चंद्राची माती पृथ्वीवर आणू. चांद्रयान-4 आणि 5 मोहिमांचे डिझाइन पूर्ण झाले आहे. चांद्रयान-3 मोहिमेने भारताची  वाढवली, पुढील दोन मोहिमा ही क्षमता आणखी वाढवतील.

2035 पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे लक्ष्यभारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याची मोहीम 2035 पर्यंत पूर्ण केली जाईल. या स्पेस स्टेशनमध्ये पाच मॉड्यूल्स असतील, पहिले मॉड्यूल 2028 मध्ये लॉन्च केले जाईल. त्याची रचना व इतर कामे पूर्ण झाली आहेत. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. भविष्यात हे अंतराळ स्थानक अंतराळवीरांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरेल, अशी माहिती इस्रो प्रमुखांनी दिली.

गगनयान मोहिमेची तयारी पूर्ण गगनयान मोहिमेबाबत ते म्हणाले की, सर्व काही तयार आहे. आम्ही तयार आहोत, अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. 2025 मध्ये 3 सदस्यांची एक टीम 3 दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या कक्षेपासून 400 किलोमीटर वर पाठवली जाईल. या मोहिमेचे पहिले मानवरहित प्रक्षेपण या वर्षी डिसेंबरमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे. 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची इस्रोची योजना आहे. यावर काम सुरू आहे, अशी महत्वाची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे, चंद्रावर पाऊल ठेवणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. शेजारी देश चीनदेखील 2030 पर्यंत आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याच्या दिशेने काम करत आहे.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3NASAनासाIndiaभारत