गडकरी बातमी जोड
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30
चौकट

गडकरी बातमी जोड
च कटपुण्यातील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय : गडकरीपुणे : पुण्याचे वाढते प्रदूषण हादेखील एक चिंतेचा विषय झाला असून एका गंभीर समस्येत त्याचे रूपांतर होत आहे, असे मत केंद्रिय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्या पदव्युत्तर पदविका व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीप्रदान सोहळ्यात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ' प्रशासकीय पातळीवर योग्य दृष्टी, निर्णय घेण्याची क्षमता आणि काम करण्याची प्रबळ इच्छा असल्यास प्रत्येक शहर हे पर्यावरणपूरक शहर होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय समाजाच्या अडचणी वेगळ्या असल्या तरी आपले शिक्षण मूल्याधिष्ठित असल्याने या शिक्षणातून केवळ सुशिक्षित समाज निर्माण होत नाही, तर सुसंस्कारीत समाज निर्माण करणे हे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. ' पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्या प्रमुख तरिता शंकर यांनी संस्थेची माहिती दिली. ग्रुप डायरेक्टर चेतन वाकलकर यांनी स्वागत केले.