गाडगे महाराज बहुउद्देशीय विकास मंडळातर्फे चष्मे वाटप

By Admin | Updated: December 27, 2014 18:55 IST2014-12-27T18:55:52+5:302014-12-27T18:55:52+5:30

फोटो आहे...

Gadge Maharaj Multipurpose Development Board's Chishma Allotment | गाडगे महाराज बहुउद्देशीय विकास मंडळातर्फे चष्मे वाटप

गाडगे महाराज बहुउद्देशीय विकास मंडळातर्फे चष्मे वाटप

टो आहे...
नागपूर : विठ्ठलनगर येथील श्री संत गाडगे महाराज उद्देशीय विकास मंडळातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात १५० गरजूंना आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डी.डी. सोनटक्के उपस्थित होते.
शिबिरात डॉ. डी.बी.चौधरी व डॉ. विरल शहा यांच्या चमुने ४०० रुग्णांची तपासणी केली. संत गाडगेबाबा यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन कोहळे यांनी दिले. प्रारंभी गाडगे महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. प्रकाश हिवरकर, रुकेश मोतीकार, दयाराम हिवरकर, कृष्णराव पारधी, माणिक भोस्कर, अशोक क्षीरसागर, भीमराव भोरकर, पंढरीनाथ भिलकर, सुरेंद्र भिलकर, संजय भिलकर, सुरेश भोस्कर, जय हिवरकर, रमेश काळे, राजकुमार आवळेकर, नागोराव क्षीरसागर, ज्ञानेश्वर भोस्कर, मायाबाई मोतीकार, चिंतामण क्षीरसागर, निशिकांत कामरकर, मनीष वानखेडे, पुंडलिक मोतीकार, कमलाकर पिंपळकर, रमेश मोकळकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Gadge Maharaj Multipurpose Development Board's Chishma Allotment