गचांडी धरुन वाहतूक पोलिसाला फेकले वाळू माफियांची मुजोरी : राष्ट्रवादी सरचिटणीसाकडून शिव्यांची लाखोली, डंपर अडविल्याचा आला राग
By Admin | Updated: June 15, 2016 23:41 IST2016-06-15T23:41:16+5:302016-06-15T23:41:16+5:30
जळगाव: वाळूचा डंपर अडविल्याचा राग आल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल तायडे यांच्या अंगावर चालकाने डंपर अंगावर नेण्यासह दुसर्याने गचांडी धरुन त्यांना लांब फेकले तर डंपर मालक व राष्ट्रवादीचा सरचिटणीस असलेल्या अजय भागवत बढे याने शिवीगाळ करत हुज्जत घातल्याची घटना बुधवारी संध्याकाळी सहा वाजता वाजता शिवाजी नगर पुलाजवळ घडली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गचांडी धरुन वाहतूक पोलिसाला फेकले वाळू माफियांची मुजोरी : राष्ट्रवादी सरचिटणीसाकडून शिव्यांची लाखोली, डंपर अडविल्याचा आला राग
ज गाव: वाळूचा डंपर अडविल्याचा राग आल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल तायडे यांच्या अंगावर चालकाने डंपर अंगावर नेण्यासह दुसर्याने गचांडी धरुन त्यांना लांब फेकले तर डंपर मालक व राष्ट्रवादीचा सरचिटणीस असलेल्या अजय भागवत बढे याने शिवीगाळ करत हुज्जत घातल्याची घटना बुधवारी संध्याकाळी सहा वाजता वाजता शिवाजी नगर पुलाजवळ घडली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाहतुक शाखेचे कर्मचारी अनिल तायडे व शकुर शेख हे दोघं शिवाजी नगरच्या बाजूने उड्डानपुलाजवळ ड्युटी करत असताना शाहरुख रहेमान सिकलकर (वय २२ रा.नशिराबाद) हा वाळूने भरलेला डंपर (क्र.एम.एच.१९ बी.एम.९०९०) घेऊन येत असताना तायडे यांनी त्याला हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने त्याकडे दुर्लक्ष करत डंपर पुढे नेला. तायडे यांनी पुढे जाऊन डंपर अडविला, तेव्हा त्याने डंपर अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. तितक्यात डंपर मालक अजय बढे हा मागून कारने आला. तू माझे डंपर अडविणारा कोण? असे म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली तर दुचाकीवरुन आलेल्या एकाने तायडे यांची गचांडी धरुन लांब फेकले,सुदैवाने वाहन येण्याच्या आत त्यांनी स्वत:ला सावरले नाही.या झटापटीत तायडे यांचा शर्ट फाटला आहे.पब्लिकसमोर झाला तमाशाहा वाद सुरु असल्याने दोन्ही बाजूने जाणार्या वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती,तर घटना पाहणार्यांची मोठी गर्दी झाली होती.अनेक जणांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. वाळूने भरलेला डंपर नंतर शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आला. बढे व चालकाला ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बढे समर्थकांनी शहर पोलीस स्टेशन गाठून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, मात्र तायडे यांनी कुठलीही तडजोड न करता फिर्याद दिली. सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी डंपर जप्त केला.जामोद येथून आणली वाळूबढे याचा जामोद येथील गिरणा नदी पात्रात वाळूचा ठेका आहे, तेथून हा डंपर वाळू भरुन आणण्यात आला. शिवाजी नगर उड्डानपुलावरुन अवजड वाहनांना बंदी असतानाही तेथून सर्रास वाहतूक केली जात आहे. कोट..बढे याने शिवीगाळ करुन धमकी दिली तर त्याच्यासोबत असलेल्या एका जणाने कॉलर धरुन लांब फेकले.यात सुदैवाने मी बचावलो.-अनिल तायडे, वाहतूक कर्मचारी