शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ऊर्जा सुरक्षेसाठी सर्वोत्तम तेच करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली ठाम भूमिका; युएईमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:21 IST

जी-७ शिखर परिषदेच्या दोन्ही सत्रांत पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन स्थितीवर भारताची स्थिती स्पष्ट केली.

 

एल्माउ (जर्मनी) :  रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर  ऊर्जा सुरक्षा आव्हानात्मक मुद्दा बनला आहे. जागतिक तेल व्यापाराचा प्रश्न येतो, तेव्हा भारत स्वत:च्या ऊर्जेच्या सुरक्षेच्या हितासाठी  सर्वोत्तम वाटेल ते करीत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ शिखर परिषदेत अधोरेखित केले.जी-७ शिखर परिषदेच्या दोन्ही सत्रांत पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन स्थितीवर भारताची स्थिती स्पष्ट केली.  शत्रूता लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचे आवाहन करून त्यांनी  वाद सोडविण्यासाठी  राजनैतिक मार्ग आणि चर्चेचा मार्ग पत्करण्याचे सुचविले, असे विदेश सचिव विनय मोहन क्चात्रा यांनी सोमवारी रात्री उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.शिखर परिषदेत रशिया-युक्रेनदरम्यानची स्थिती स्वाभाविकच चर्चेचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता. पंतप्रधान मोदी यांनी हवामान बदल, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा तसेच लैंगिक समानतेवर आयोजित सत्रात रशिया-युक्रेन स्थितीवर भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत या आव्हानात्मक काळात गरजू देशांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याकामी योगदान देण्याच्या दिशेने अग्रणी राहिला आहे.सोमवारी  जी-७  शिखर परिषदेत युक्रेन संकटाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी  म्हणाले  की, जी-७ शिखर परिषदेसाठी निमंत्रित देश जागतिक तणावाच्या वातावरणात भेटत आहेत. भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे, असे  क्वात्रा यांनी सांगितले.

भेटवस्तूंबाबत सोशलवरही चर्चा...भारताची समृद्ध कलाकुसर, संस्कृती आणि वारसा दाखवणाऱ्या भेटवस्तू दिल्याबद्दल नेटकऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जो बायडेन यांना वाराणसीहून मागवलेली गुलाबी मिनेकारी कलाकृती, ओलाफ शॉल्ज यांना मुरादाबादहून मागवलेले कफलिंक आणि ब्रोच दिले. फुमियो किशिदा यांना उत्तर प्रदेशच्या निझामाबादहून मागवलेली काळ्या मातीची भांडी भेट दिली. बोरिस जॉन्सन यांना प्लॅटेनियमचा टी-सेट दिला. इमॅन्यूल मॅक्रो यांना जरदोजीच्या पेटीत अत्तराच्या बाटल्या भेट दिल्या. सिरिल रामफोसा यांना रामायण कथासूत्र असलेली डोक्रा कलाकृती भेट दिली. जोको विडोडो यांना वाराणसी येथील लाखवेअर राम दरबार, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिट ट्रुडो यांना काश्मीरमधील हाताने विणलेला रेशमी गालिचा दिला. 

अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विविधतेचे रक्षण करण्याचा निर्धारजी-७ समूह आणि भारतासह पाच भागीदार देशांच्या नेत्यांनी सांगितले की, आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैविधतेचे रक्षण करण्यासाठी सार्वजनिक संवाद आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन माहितीच्या मुक्त  संचारासाठी कटिबद्ध आहोत. जी-७ शिखर परिषदेदरम्यान सोमवारी जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवदेनात पंतप्रधान मोदी यांनी सर्व नेत्यांना सांगितले की, या तत्त्वाच्या रक्षणासाठी आम्ही तयार असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाचा निर्धार करतो. भारत सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याबाबत आग्रही असणाऱ्यांची गळचेपी करीत आहे, असा आरोप होत असतांना हे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे.

पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातमध्ये- पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेनंतर जर्मनीहून मंगळवारी संयुक्त अरब अमितरातच्या दौऱ्यावर रवाना झाले. अबुधाबी विमानतळावर संयुक्त अरब अमिरातचे नवनियुक्त अध्यक्ष आणि शासक शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे शाही परिवारातील वरिष्ठ सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भेट घेऊन संयुक्त अरब अमिरातचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन जायद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. - पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, माझ्या स्वागतासाठी विमानतळावर आल्याने मी माझे बंधू शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या विशेष सद्भावाने प्रभावित आहे. मी त्यांचा आभारी. मागच्या महिन्यात नाहयान यांची संयुक्त अरब अमिरातचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती