शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची हुडा यांच्याशी तडजोड; गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 08:42 IST

जम्मू-काश्मीरसाठी गुलाम नबी आझाद यांच्याशी, तर हिमाचल प्रदेशसाठी आनंद शर्मा यांच्याशीही तडजोड केली जाणार असल्याचे समजते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असंतुष्ट समूहातील काही मोजक्या नेत्यांशी तडजोड करण्याचा निर्णय घेतला असून, हरियाणातील ज्येष्ठ नेते भूपेंदरसिंग हुडा यांच्याशी सकारात्मक बोलणी झाल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरसाठी गुलाम नबी आझाद यांच्याशी, तर हिमाचल प्रदेशसाठी आनंद शर्मा यांच्याशीही तडजोड केली जाणार असल्याचे समजते.काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आव्हान देणाऱ्या असंतुष्ट समूहातील काही नेत्यांशी नेतृत्व कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगण्यात आले. या नेत्यात कपिल सिबल, विवेक तन्खा आणि पी. जे. कुरियन यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा हे अलीकडे असंतुष्टांच्या बैठकांना फारसे उपस्थित नसले तरी त्यांना राज्यसभेची जागा मिळेल का, याबाबत अनिश्चितता आहे. पृथ्वीराज चव्हाण हेही राज्यसभेवर जाण्याबाबत उत्सुक असले तरी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदरसिंग हुडा यांच्याशी पक्ष नेतृत्वाची सकारात्मक बैठक गुरुवारी झाली. प्राथमिक प्रस्तावानुसार, हुडा हे हरियाणाच्या सीएलपीचा राजीनामा देतील. त्यांच्या जागी भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिष्णोई यांची वर्णी लागेल. हरियाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  कुमारी शैलजा यांच्या जागी हुडा यांचे पुत्र दीपेंदरसिंग हुडा यांची वर्णी लागेल. हुडा यांना काँग्रेस कार्यकारी समितीत (सीडब्ल्यूसी) सामावून घेतले जाईल. सीडब्ल्यूसीचे विशेष निमंत्रित असलेले दीपेंदरसिंग हुडा यांच्या जागी कुमारी शैलजा यांची नियुक्ती होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस