भविष्यात म्हापसा अर्बन बॅँक ही र
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:00+5:302015-03-25T21:10:00+5:30
ाष्ट्रीय बॅँक होईल- परैरा

भविष्यात म्हापसा अर्बन बॅँक ही र
ा ्ट्रीय बॅँक होईल- परैराबार्देस, : म्हापसा अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅँक गोवाने सहकार क्षेत्रात ५० वर्षानंतरच्या कालखंडात इतर बॅँकेशी स्पर्धा करीत सामान्यातल्या सामान्य माणसांना आर्थिक सहकार्य दिले. व्यवस्थापन व कर्मचारी वर्गाने ग्राहकांना सेवा मिळवून दिल्यामुळे राज्याच्या विकासात भर पडली. भविष्यात म्हापसा अर्बन बॅँक ही राष्ट्रीय बॅँक होईल, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा न्यायाधिश आल्वारो नोरोन्हा परैरा यांनी म्हापसा अर्बन बॅँकेच्या सुवर्ण महोत्सवी नंदादीप सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर बॅँकेचे अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप, उपाध्यक्ष गुरूदास नाटेकर, तुलियो डिसोझा, सत्कारमूर्ती माजी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सीस डिसोजा, ॲड. मनोहर शेणवी उजगावकर, वासुदेव शिरोडकर, अरूण नाईक, संचालक मंगलदास नाईक, आश्विन खलप, मायकल कारास्को, बाबूसो हडफडकर, आर्थिक सल्लागार प्रभाकर वेर्णेकर, सरव्यवस्थापक साल्वादोर पिंटो उपस्थित होते. निवृत्त न्यायाधिश परेरा यांच्या हस्ते बॅँकेचे माजी अध्यक्ष ॲड. फ्रान्सीस डिसोजा, मनोहर शेणवी उजगावकर, वासुदेव शिरोडकर, बाबा हिरू नाईक यांचे चिरंजीव अरूण नाईक यांचा सत्कार करण्यात आले. परैरा पुढेबोलताना म्हणाले की, बॅँकेला वैभव प्राप्त करण्यासाठी झटलेल्या सर्व संचालकांचा सत्कार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.सत्काराला उत्तर देताना उपमुख्यमंत्री ॲड. डिसोझा यांनी सांगितले आपण अध्यक्ष असताना आपणास संचालक व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले. म्हापसा अर्बन बॅँक सर्वसामान्य जनतेची आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याची विनंती त्यांनी केली. माजी अध्यक्ष मनोहर उजगावकर यांनी सांगितले की, आजआपण बॅँकेत आल्यानंतर आपल्याला घरात आल्यासारखे वाटले. म्हापसा वासियांनी नेहमी पाठिंबा दिला व विश्वास ठेवला त्यामुळेच बॅँकेचा व्यवहार करायला अडचण आली नाही असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोजा यांच्याहस्ते बॅँकेच्या एसएमएस सेवेचा शुभारंभ केला. अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप यांचा सभागृहाची मान्यता घेऊन प्रमुख पाहुणे आल्वारो नोरोन्हा परैरा यांच्या हस्ते शाल श्रीफळ व नंनादीप देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सर व्यवस्थापक साल्वादोर पिंटो, तर आभार उपाध्यक्ष तुलियो डिसोझा यांनी मानले. फोटो :2403-एमएपी-06-03फोटो ओळ : म्हापसा अर्बन बॅँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी अध्यक्ष तथा विद्यमान उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांचा सत्कार करताना आल्वारो नोरोन्हा परैरा. बाजूस अध्यक्ष रमाकांत खलप व इतर. (छाया : प्रकाश धुमाळ)