शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने दिलेल्या ऊर्जेतून भावी वाटचाल; राहुल गांधींनी पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:48 IST

महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ  मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत.

जळगाव जामोद (जि. बुलढाणा) :  महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद व भरभरून प्रेम दिले. यात्रेत बहुसंख्येने लोक बरोबरीने चालले. छत्रपती शिवाजी महाराज,  शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत साईबाबा व श्री संत गजानन महाराज या संत-महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा मिळाली. पुरोगामी महाराष्ट्रातून मोठी ऊर्जा मिळत गेली, या शब्दांत खा. राहुल गांधी यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रात भावना व्यक्त केल्या. 

महाराष्ट्रातून उद्या सकाळी यात्रा मध्यप्रदेशला रवाना होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला काढलेल्या पत्रात राहुल म्हणतात, महाराष्ट्रातील कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांना त्यांच्या तपस्येचे फळ  मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. कृषी साहित्याच्या किमतीतील प्रचंड वाढ, शेतमालाच्या भावातील अनियमितता व फसलेली पीक विमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलले आहे, ही स्थिती पाहून आपण व्यथित झालो. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हताश झालेत. आदिवासींच्या अधिकारावर गदा आलेली आहे. 

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी फुले, शाहू, आंबेडकर, तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांचा जाज्वल्य विचार देशाला दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता करीत असल्याचे पाहून समाधान वाटले. अशा विचाराच्या जनतेने यात्रेला दिलेला प्रतिसाद हा ऊर्जा देणारा ठरणार आहे.

पुरोगामी मातीचा गंध- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पवित्र भूमीतून मध्यप्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध व विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ, असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देतो. - प्रेम, प्रतिसाद व आदरातिथ्य यातून मोठी नवीन ऊर्जा घेऊन जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

‘भारत जोडो’ यात्रेचे आज मध्य प्रदेशकडे प्रयाण; काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवारी (दि. २३) जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या आमपाणी कॅम्प येथून सकाळी ६ वाजता मध्य प्रदेशातील बोदरलीकडे प्रयाण करणार आहेत. 

आमपाणी-बोदरली हा प्रवास राहुल गांधी व त्यांचे यात्रेकरू हे सुरक्षेच्या कारणावरून वाहनाने करणार आहेत. आमपाणी-बोदरली हा रस्ता सातपुडा पर्वतातून असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात पदयात्रा राहणार नाही. मध्य प्रदेशातील बोदरली येथून त्यांची पदयात्रा पूर्ववत सुरू होईल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा