शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींना समाधी, गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्याशेजारीच अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 6:08 AM

कांची कामकोटी मठाचे ६९ वे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्यावर मठाच्या परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जयेंद्र सरस्वती यांचे गुरू श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या शेजारीच त्यांची समाधी असेल.

चेन्नई : कांची कामकोटी मठाचे ६९ वे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्यावर मठाच्या परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जयेंद्र सरस्वती यांचे गुरू श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या शेजारीच त्यांची समाधी असेल. जयेंद्र सरस्वती (८२) यांचे बुधवारी निधन झाले. कनिष्ठ पुजारी श्री विजयेंद्र सरस्वती यांनी अंत्यसंस्कार केले. अभिषेक, पूजा आणि आरती आदी विधींना सकाळी सात वाजता प्रारंभ झाला होता. बुधवारी संपूर्ण रात्रभर वेगवेगळ््या ठिकाणांहून आलेले भाविक शंकराचार्यांना आदरांजली अर्पण करीत होते. तथापि, बाहेरच्या लोकांना विधींमध्ये सहभागी होण्यास मुभा नव्हती. विधी झाल्यानंतर त्यांना समाधी दिली गेली. तमिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा आणि पी. राधाकृष्णन व इतर महत्वाच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली अर्पण केली व विधीच्या वेळी ही मंडळी उपस्थित होती. सकाळी मठाच्या अधिकाºयांनी लोकांना दर्शन मनाई केली व श्लोकांचे पठण सुरू केले. वृंदावनच्या स्थापनेची प्रक्रिया बघण्यास छोट्याशा सभागृहात मोठी गर्दी जमली होती.यावेळी के. नजिमुद्दीन म्हणाले की, मी मठाला गेली २० वर्षे भेट देत आहे. जयेंद्र सरस्वती यांनी कधीही धार्मिक भेदभाव केला नाही. ते धार्मिक ऐक्याला प्रोत्साहन द्यायचे, असे ते म्हणाले. फर्निचर बनवणारे ए. एस. नझीर म्हणाले की, मी आचार्यांसाठी बनवलेला सोफा काहीच दिवसांपूर्वी त्यांना दिला होता परंतु त्यांची माझी भेट न झाल्यामुळे सोफ्याबद्दलचे त्यांचे मत समजले नाही. इस्लामबद्दलची माहिती ते खूप उत्सुकतेने घेत.>समाजसेवेचा गौरवजयेंद्र सरस्वती यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी धार्मिक, राजकीय विचारधारा बाजुला ठेवून शेकडो लोक रांगेत उभे होते.आचार्यांच्या समाजसेवेचा गौरव त्यांनी केला. स्थानिक मुस्लिम रहिवाशांचा गट श्रद्धांजली वाहण्यास आला होता.>६९ वे शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्यावर मठाच्या परिसरात गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.