निधी अखर्चित राहणार

By Admin | Updated: February 7, 2015 02:05 IST2015-02-07T02:05:05+5:302015-02-07T02:05:05+5:30

Funds will remain printed | निधी अखर्चित राहणार

निधी अखर्चित राहणार

>जिल्हा परिषद : मार्चपूर्वी निधी खर्च करण्यासाठी धावपळ
नागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, सत्तेवर आलेले नवीन पदाधिकारी याचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. दुसरीकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने जिल्हा परिषदेचा २०१४-१५ या वर्षाचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची शक्यता सदस्यांनी वर्तवली आहे.
नियोजन चुकल्याने १३ वा वित्त आयोग, अतिवृष्टीग्रस्त भागातील रस्ते दुरुस्ती, सेस फंडाचा निधी अखर्चित राहणार आहे. अखर्चित निधीमुळे गेल्या वर्षीचा जि.प.चा अर्थसंकल्प ६ कोटींनी फुगला होता. यंदाही अशीच परिस्थिती आहे. उलट यात जादाची भर पडण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी नियोजन क ोलमडल्याने विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या नव्हत्या. यंदाही अशीच परिस्थिती आहे. पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, समाजकल्याण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ गरजूंना ३१ मार्चपूर्वी मिळण्याची शक्यता कमी आहे.
दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी व व पुरामुळे तसेच जड वाहनांच्या वाहतुकीमुळे नादुरस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जि.प.च्या बांधकाम विभागाने शासनाकडे ३७० कोटींची मागणी केली होती. परंतु शासनाकडून जेमतेम ३२ कोटी मिळालेले आहे. आधीच निधी कमी मिळाला. तोही मार्चपूर्वी खर्च होण्याची शक्यता कमी आहे. शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
चौकट..
दलित वस्त्यांचा विकास मंदावला
ग्रामीण भागातील दलित वस्त्यांच्या विकास व्हावा, यासाठी समाजकल्याण विभागाला निधी उपलब् ध केला जातो. परंतु २०१४-१५ या वर्षाचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट...
आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव अडकले
लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या नाही. त्यातच बांधकाम मंजूर असूनही प्रस्तावित आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे प्रस्ताव अडकले आहेत.

Web Title: Funds will remain printed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.