उपमहापौरांना उत्तर देण्यासाठी मुदत खंडपीठातील कामकाज: २४ रोजी कामकाज
By Admin | Updated: February 4, 2016 00:06 IST2016-02-04T00:06:24+5:302016-02-04T00:06:24+5:30
जळगाव : ठरावांच्या अंमलबजावणीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदार उपमहापौर सुनील महाजन यांना प्रशासनाने सादर केलेल्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत बुधवारी दिली. दरम्यान, याप्रश्नी आता २४ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे.

उपमहापौरांना उत्तर देण्यासाठी मुदत खंडपीठातील कामकाज: २४ रोजी कामकाज
ज गाव : ठरावांच्या अंमलबजावणीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदार उपमहापौर सुनील महाजन यांना प्रशासनाने सादर केलेल्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत बुधवारी दिली. दरम्यान, याप्रश्नी आता २४ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे. महापालिका प्रशासन सभागृहाने मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करत नसल्याप्रकरणी उपमहापौर सुनील महाजन यांनी औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. बुधवारी याप्रश्नी कामकाज होते. मनपा प्रशासनाकडून याप्रश्नी अगोदरच प्रतिज्ञापत्र सादर झाले आहे. बर्याच ठरावांची अंमलबजावणी झाली असून काहींची कामे प्रगतीपथावर आहेत. सुनील महाजन हे उपमहापौर असल्याने सभागृहात त्यांचा कामकाजात सहभाग असतो. त्यामुळे हा विषय मनपा सभागृहातच मार्गी लावता आला असता असे प्रशासनाकडून सादर खुलाशात नमुद आहे. दरम्यान, यावर तक्रारदार महाजन यांना आपले उत्तर सादर करावयाचे आहे. त्यांच्यातर्फे यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागून घेण्यात आली. न्यायालयाने मागणी मान्य करत याप्रश्नी २४ फेब्रुवारी रोजी कामकाज होईल, असे स्पष्ट केले. न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. ए.एम. बदर यांच्यापुढे हे कामकाज सुरू आहे. दरम्यान, न्यायालयात कामकाज असल्याने आयुक्त संजय कापडणीस दुपारनंतर तातडीने औरंगाबादला रवाना झाले होते.