शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीचे संकट; तेल उत्पादनात विक्रमी कपात करणार ओपेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 06:58 IST

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी पेट्रोल-डिझेल महागण्याचा धोका निर्माण झाला आहे. ​​​​​​

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज १.२ दशलक्ष बॅरलची विक्रमी कपात करण्याचा निर्णय तेल उत्पादक व निर्यातदार देशांनी (ओपेक) घेतला आहे. या कपातीमुळे भारतातील २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी पेट्रोल-डिझेल महागण्याचा धोका निर्माण झाला आहे.ओपेक ही तेल उत्पादन व निर्यातीत अग्रेसर असलेल्या १४ देशांची संघटना आहे. एकूण जागतिक तेल पुरवठ्यातील ४० टक्के तेल या देशांतून येते. या देशांनी जाहीर केलेली तेल उत्पादनातील कपात भारताच्या एकूण तेल वापराच्या चौथ्या हिश्श्याएवढी आहे. ओपेक देशांनी शुक्रवारी तेल कपातीच्या करारावर शिक्कामोर्तब केले. ओपेकचा करार होताच जागतिक तेल बाजारात तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या. या निर्णयाचा खरा परिणाम सोमवारी बाजार उघडल्यानंतर दिसून येईल. येत्या एप्रिलमध्ये या निर्णयाचा आढावा ओपेक घेणार आहे.

८२% आयात ओपेककडूनभारत आपल्या एकूण तेल वापरापैकी ८० टक्के तेल आयात करतो. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी ८२ टक्के तेलाची आयात ओपेक देशांतूनच होते. याशिवाय ७५ टक्के नैसर्गिक वायू आणि ९७ टक्के एलपीजीही भारत आपेककडूनच घेतो. त्यामुळे ओपेकच्या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवणे सरकारसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. तेलाच्या किमती १ ऑक्टोबरपासून३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे देशातील इंधनाचे दर १० टक्क्यांनी घटले आहेत.

अंदाजावर पाणीशुक्रवारी संपलेल्या पाच राज्यांतील निवडणुकांसाठी ही बाब सरकारच्या पथ्यावर पडणारी ठरली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी तेल आणखी घसरेल, असा अंदाज होता. ही बाब मोदी सरकारसाठी मोठाच दिलासा देणारी होती. तथापि, ओपेकच्या उत्पादन कपातीच्या निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले आहे. 

टॅग्स :Crude Oilखनिज तेलPetrolपेट्रोलDieselडिझेल