शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ : पत्रकाराने करुन दिली आठवण, बाबा रामदेव चांगलंच भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 06:42 IST

बाबा रामदेव यांनी जनतेला जास्त परिश्रम करण्याचा सल्लाही दिला. महागाई कमी झाली पाहिजे, असे मलाही वाटते, पण लोकांनी जास्त मेहनत करायला हवी. 

करनाल : पेट्राेल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याेगासने करून फिटनेसचा फंडा देणारे याेगगुरू बाबा रामदेव इंधन दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यानंतर पत्रकारावर भडकले. संतापाच्या भरात त्यांनी पत्रकारला ‘गप्प बस, नाही तर चांगले हाेणार नाही’, अशी धमकीही दिली. बाबा रामदेव यांनी जनतेला जास्त परिश्रम करण्याचा सल्लाही दिला. महागाई कमी झाली पाहिजे, असे मलाही वाटते, पण लोकांनी जास्त मेहनत करायला हवी. 

नेमके काय झाले?१ बाबा रामदेव हे करनाल येथे मित्र महाराज अभेदानंद यांना भेटण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. मात्र, पेट्राेल आणि डिझेल दरवाढीबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर ते भडकले.२पत्रकाराने त्यांना काही वर्षांपूर्वी त्यांनीच केलेल्या, पेट्राेल ४० रुपये प्रतिलीटर आणि घरगुती गॅस ३०० रुपये प्रतिसिलिंडर दराने देणाऱ्या सरकारला निवडून द्यायला हवे, या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर बाब रामदेव यांनी संतापून उत्तर दिले, की हाे, मी म्हणालाे हाेताे. तुम्ही काय करू शकता, असे प्रश्न विचारू नका. ३मी तुमचा ठेकेदार आहे का जाे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत राहणार? यानंतर पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाबा रामदेव चांगलेच भडकले. हाे, मी केले हाेते वक्तव्य, आता तू काय करणार आहेस? गप्प राहा, पुन्हा प्रश्न केला तर तुझ्यासाठी हे चांगले नसेल. थाेडा सभ्य राहायला शिक, असा सल्लाही त्यांनी पत्रकाराला दिला.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPetrolपेट्रोल