भारतातील नुकसानभरपाईसाठी अमेरिकेत चढ्या दराने औषधविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 23:53 IST2018-07-31T23:52:54+5:302018-07-31T23:53:08+5:30
केंद्र सरकारने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा सपाटा लावल्याचा फटका अमेरिकेतील औषध कंपन्यांना बसत आहे. भारतातील नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी अमेरिकेत विकली जाणारी औषधे महाग करणे सुरू केले आहे.

भारतातील नुकसानभरपाईसाठी अमेरिकेत चढ्या दराने औषधविक्री
मुंबई : केंद्र सरकारने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा सपाटा लावल्याचा फटका अमेरिकेतील औषध कंपन्यांना बसत आहे. भारतातील नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी अमेरिकेत विकली जाणारी औषधे महाग करणे सुरू केले आहे. भारताकडून होणाऱ्या दर नियंत्रणामुळे उभय देशांतील व्यापारी प्रतिनिधी हादरून गेले आहेत. यापुढे अन्य वैद्यकीय उपकरणे दर नियंत्रणाच्या कक्षेत आणू नका, अशी विनंती त्यांनी केंद्राला केली आहे.
जगभराला औषधांचा पुरवठा करण्यात अमेरिकन कंपन्या अग्रेसर आहेत. भारतही अमेरिकन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करतो. पण केंद्राने राष्टÑीय औषधे किंमत निश्चिती प्राधिकरणाद्वारे (एनपीपीए) ८५१ औषधांच्या दरांवर नियंत्रण आणले. त्यामध्ये हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाºया स्टेन्ट्सपासून ते हृदयाशी संबंधित विविध उपकरणांचा समावेश आहे. अमेरिकेतून आयात केल्यानंतर कंपन्यांना या उपकरणांची विक्री नियंत्रित दराने करावी लागते. यामुळे कंपन्यांचे नुकसान होते. ते भरून काढण्यासाठी या कंपन्यांनी अमेरिकेत औषधे महाग करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत तेथील वैद्यकीय क्षेत्राकडून तीव्र नाराजी आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारने औषधनिर्मिती कंपन्यांना अलीकडे दरवाढीबाबत इशारा दिला होता. त्यानंतर अनेक कंपन्यांना दरवाढ मागे घ्यावी लागली.