शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चूक की फसवणूक?; रशियामुळे सात वर्षं रखडलं 'चंद्रयान २'; इस्रोला मोजावी लागली होती मोठी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:20 IST

चंद्रयान-2 मिशनमध्ये रशियाही भारताचा भागिदार होता. मात्र, इस्रोला याची मोठी किंमत मोजावी लागली होती...

आज सायंकाळी भारताचे चंद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या या मोहीमेवर लागलेले आहे. आजवर कुठलाही देश चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर पाऊल ठेवू शकलेला नाही. रशियाचे लुना-25 दुर्घटनाग्रस्त झाल्याने, या जटिल मिशनसंदर्भात सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली आहे. असे असतानाही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ चंद्रयान-3 चंद्रावर सुरक्षितपणे उतरवण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. या मिशनमध्ये 2019 मध्ये पाठवण्यात आलेल्या चंद्रयान-2 चे ऑर्बिटरही भारताची मदत करत आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की, चंद्रयान-2 मिशनमध्ये रशियाही भारताचा भागिदार होता. मात्र, इस्रोला याची मोठी किंमत मोजावी लागली होती.

रशियातून येणार होतं चंद्रयान-2 चं लँडर -इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे लूना-25 शनिवारी चंद्राच्या पृष्ठभागावर दुर्घटनाग्रस्त झाले. या अंतराळ यानाला असलेल्या लँडरचे एक जुने व्हेरिअंट भारताच्या चंद्रयान-2 सोबत जाणार होते. मात्र असे होऊ शकले नव्हते. चंद्रयान-2 मिशनमध्ये एक लँडर आणि रोव्हर सामील होते. जे 2011-12 मध्येच लॉन्च करण्यात येणार होते. तेव्हा भारताने आपले लँडर आणि रोव्हर विकसित केलेले नव्हते. खरे तर, चंद्रयान-2 हे अंतराळ यान रशियासोबत संयुक्तपणे विकसित करण्यात आले होते. यात भारताला रॉकेट आणि ऑर्बिटर उपलब्ध करायचे  होते. तर लँडर आणि रोव्हर रशियातून येणार होते. 

चंद्रयान-2 मिशनमधून कसा बाहेर पडला रशिया? - चंद्रयान-2 साठी रशिया ज्या प्रकारचे लँडर आणि रोव्हर तयार करत होते, त्यात एका वेगळ्या मिशनवर काही समस्या दिसून आली. यानंतर, रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोसला लँडरच्या डिझाइनमध्ये काही बदल करावे लागले. मात्र नवे डिझाईन मोठे असल्याने ते भारतीय यानात सेट केले जाऊ शकत नाव्हते. यामुळे रशिया चंद्रयान-2 मिशनमधून बाहेर पडला आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रोला स्वदेशी लँडर आणि रोव्हर विकसित करण्याच्या कामाला लागावे लागले. यासाठी भारताला तब्बल 7 वर्ष लागली आणि नंतर चंद्रयान-2 हे 2019 मध्ये लॉन्च केले जाऊ शकले.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रोIndiaभारतrussiaरशिया