मित्रानेच घातला तीन लाखांचा गंडा

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:06+5:302015-08-11T23:16:06+5:30

The friend has given three lakh rupees | मित्रानेच घातला तीन लाखांचा गंडा

मित्रानेच घातला तीन लाखांचा गंडा

>नागपूर : श्रीरामपूरच्या एका तरुणाला त्याच्या बुटीबोरीतील दोन मित्रांनी तीन लाखांचा गंडा घातला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. संतोष केरू गायकवाड (वय ३०) असे फसगत झालेल्या तरुणाचे नाव असून तो श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहे.
संतोषचा मित्र संदीप भोंगरे याने काही दिवसांपूर्वी बुटीबोरी येथील आरोपी सुनील जठारिया (वय ३५) याच्यासोबत ओळख करून दिली होती. सुनील ५० टक्के कमी दराने ब्रॅण्डेड कंपनींचे तयार कपडे मिळवून देतो, अशीही बतावणी केली होती. त्यानुसार, संतोषने सुनीलसोबत संपर्क साधला. सोमवारी दुपारी १२ वाजता कपडे घेण्यासाठी हे दोघे एम्प्रेस मिलमध्ये गेले. तेथे संतोषकडून आरोपी सुनीलने तीन लाखांची रोकड घेतली.त्याला बाहेर थांबायला सांगून सुनील आत गेला तो परतलाच नाही. एक तासानंतर संतोष आत गेला तेव्हा त्याला सुनील दिसला नाही. तो रक्कम घेऊन पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर संतोषने गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सुनील जठारियाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
---

Web Title: The friend has given three lakh rupees