शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 21:43 IST

फ्रान्सच्या 'पाथ स्टोअर' या कंपनीनं भारतात अवघ्या २९९ रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

RT-PCR testing: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना आता पुन्हा एकदा व्यवहार हळूहळू रुळावर येत आहेत. सध्या कामकाजाच्या ठिकाणी कोरोनाची RT-PCR चाचणीचा निगेटीव्ह अहवाल दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यातच फ्रान्सच्या 'पाथ स्टोअर' या कंपनीनं भारतात अवघ्या २९९ रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही कंपनी संपूर्ण देशभरात ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. सध्या गुरूग्राम येथे कंपनीनं आरटीपीसीआर आणि जैव सुरक्षा स्तराची चाचणी करणारी लॅब उभारली आहे. यात एका दिवसात १ लाख नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता आहे. स्वस्तात आरटीपीसीआर चाचणी होणार असल्यानं याचा पर्यटन, उद्योग आणि किरकोळ क्षेत्रात खूप मोठी मदत मिळणार आहे. 

"समाजातील आर्थिकरित्या कमकुवत गटाला कोरोना चाचणी स्वस्तात उपलब्ध झाल्यानं मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात देशातील सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये विविध ठिकाणी कंपनीकडून स्वस्तात आरटीपीसीआर चाचण्यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. यात कंपनीकडून आरटीपीसीआर चाचणीसाठीचे नमुने जमा करण्यासाठी २ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे", अशी माहिती पाथस्टोअर कंपनीची मूळ कंपनी असणाऱ्या GeneStore चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुभव अनुषा यांनी दिली. 

RT-PCR चाचणी सर्वात अचूक चाचणीकोरोना व्हायरसची लागण झाल्याची चाचणी करण्यासाठी सध्या दोन चाचण्यांचा पर्याय उपलब्ध आहे. यात आरटीपीसीआर आणि दुसरा पर्याय रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) उपलब्ध आहे. या दोन्ही चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्या रुग्णांला कोरोनाची लागण झाल्याचं निश्चित करण्यात येतं. पण रॅपिड अँटिजन टेस्टच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचणी अधिक अचूक असल्याचं मानलं जातं. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीला सर्वाधिक महत्व आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या