CCDच्या फ्रीजमध्ये झुरळं, व्हिडीओ काढणा-या ग्राहकाच्या लगावली कानाखाली

By Admin | Updated: March 30, 2017 08:32 IST2017-03-30T08:09:52+5:302017-03-30T08:32:09+5:30

जयपूर येथील सीसीडीमधील फ्रीजमध्ये झुरळांचा वावर असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. या सीसीडीमध्ये आलेल्या एका ग्राहकानं 17 सेकंद असलेल्या व्हिडीओचं चित्रीकरण केलं आहे.

Freeze the CCD's fridge, under the control of the video removing the customer | CCDच्या फ्रीजमध्ये झुरळं, व्हिडीओ काढणा-या ग्राहकाच्या लगावली कानाखाली

CCDच्या फ्रीजमध्ये झुरळं, व्हिडीओ काढणा-या ग्राहकाच्या लगावली कानाखाली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - जयपूर येथील सीसीडीमधील फ्रीजमध्ये झुरळांचा वावर असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. या सीसीडीमध्ये आलेल्या एका ग्राहकानं 17 सेकंद असलेल्या व्हिडीओचं चित्रीकरण केलं आहे.  
अर्पण वर्मा असं या ग्राहकाचं नाव असून त्याने याबाबत तक्रार करण्यासाठी पुरावा म्हणून या व्हिडीओचं त्यानं चित्रीकरण केल्याची माहिती समोर येत आहे. 
 
दरम्यान, चित्रीकरण करायला सुरुवात केल्यानंतर अडचण निर्माण होणार असल्याचं लक्षात येताच तेथील महिला कर्मचा-याने अर्पणला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला न जुमानत अर्पणनं चित्रीकरण सुरू ठेवलं त्यामुळे संतापलेल्या त्या महिलेने त्याच्या कानाखाली लगावली. 
 
अर्पणचा मित्र निखिल आनंदने हा व्हिडीओ 25 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केला. यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  ट्विटरवर तर #BoycottCCD असा ट्रेंडही सुरू आला आहे.  #BoycottCCD वापरुन नेटीझन्स आपला राग व्यक्त करत आहे. 
 
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं आपला संताप व्यक्त करत असून सीसीडीसारखा मोठा ब्रँड आपल्या ग्राहकांसोबत असे वर्तन कसं करू शकता? यावर सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे. 
 
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये असलेल्या एका ‘सीसीडी’ मध्येही चक्क जीवंत उंदीर सापडल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात आता झुरळं सापडल्याने ‘सीसीडी"च्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.  

Web Title: Freeze the CCD's fridge, under the control of the video removing the customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.